Home /News /mumbai /

सासरे विधान परिषदचे सभापती तर जावई विधानसभेचे अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड

सासरे विधान परिषदचे सभापती तर जावई विधानसभेचे अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड

Maharashtra Speaker Election: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील विधानसभेचे सर्वात तरुण सभापती आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 3 जुलै : महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्याच परीक्षेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार उत्तीर्ण झाले आहे. राहुल नार्वेकर (rahul narwekar) यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना 164 मते मिळाली तर विरोधी पक्षाचे राजन साळवी यांना 107 मतांवर समाधान मानावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील विधानसभेचे सर्वात तरुण सभापती आहेत. राहुल हे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या राहुल नार्वेकर यांना विधानसभेच्या कोणत्याही सदस्यावर अन्याय होता कामा नये, असे सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल हे सक्षम नेते आहेत. तरुण आहेत. संपूर्ण देशात त्यांच्यासारखा तरुण विधानसभा अध्यक्ष नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युतीचे हे सरकार महाराष्ट्राच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे फडणवीस म्हणाले. यामध्ये अध्यक्ष (नार्वेकर) चांगले सहकार्य करतील अशी आशा आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित भाजप-शिवसेना सरकारने कारभार स्वीकारला आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की लोक सरकारच्या विरोधातून बाजू बदलतात, पण यावेळी सरकारचे नेते विरोधी पक्षात गेले. ते म्हणाले की, मी स्वत: मंत्री होतो, इतर अनेक मंत्रीही सरकारमधून बाहेर पडले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारधारेला वाहिलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी ही मोठी गोष्ट होती.

  एकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे

  288 सदस्यीय विधानसभेत सभापती निवडीवेळी केवळ 274 सदस्यांनी मतदान केले. 12 आमदार कोणत्या ना कोणत्या कारणाने गैरहजर राहिले. महाराष्ट्रातील विधानसभेचे अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेचे कामकाज चालवले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादात झिरवाळ यांच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर शिंदे सरकारने येताच नवीन अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. राहुल नार्वेकर हे एका राजकीय कुटुंबातील आहेत. ते सध्या महाराष्ट्रातील कुलाबा मतदारसंघातून आमदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पहिल्यांदाच आमदार झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशीही त्यांचा संबंध होता. नार्वेकर हे शिवसेना युवा शाखेचे प्रवक्तेही राहिले आहेत. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे नगरसेवक राहिले आहेत. शिवसेनेत असताना राहुल यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपला दावा मांडला होता. मात्र, त्यांना तिकीट मिळाले नव्हते. यानंतर राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Eknath Shinde, Ramraje nimbalkar

  पुढील बातम्या