मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात 8 ते 12वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता राज्यात प्राथमिक शाळा सुरू (Maharashtra Primary School reopen) कऱण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात टास्क फोर्सने सुद्धा महत्त्वाचा सल्ला राज्य सरकारला (Maharashtra Government) दिला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सुद्धा महत्तवाची माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबतही शाळा सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा झाली आहे. शालेय शिक्षण विभागाचाही शाळा सुरू कऱण्याच्या संदर्भात प्रस्ताव आहे. आरोग्य विभागाने तर परवानगी दिली आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, निश्चितपणे मुख्यमंत्री स्तरावर या संदर्भात अंतिम निर्णय होईल. तसेच 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा सुद्दा मुद्दा मांडण्यात आला आहे.
50 टक्के पर्यंतच्या परवानग्या नाट्यगृह आणि सिनेमागृहांना दिल्या आहेत. परिस्थिती सुधारत आहे आणि अशीच सुधारत राहिली तर भविष्यात निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री स्तरावर यावर निर्णय घेण्यात येईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
वाचा : राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होण्याचे संकेत
राजेश टोपे पुढे म्हणाले, आता राज्यात 700 ते 800 रुग्ण दैनंदिन आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रामाण 98 टक्के इतके आहे. मुले आजारी पडल्याचं प्रमाण जास्त नाहीये. पालकांनी चिंता करण्याचं कारण नाहीये. तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी ती सैनव्य स्वरुपाची असेल, सध्यातरी फार काळजीचा विषय नाहीये, मात्र, असे असले तरी, काळजी घेणं आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
लसीकरणाच्या बाबतीत पहिला डोस पूर्ण झाल्याचे प्रमाण 80 टक्के इतके आहे तर दुसरा डोस पूर्ण झाल्याचं प्रमाण 40 टक्के इतके आहे. आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे तर त्यांना बूस्टर डॉस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
टास्क फोर्सचा राज्य सरकारला सल्ला
प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि बोर्डिंग शाळा सुरू करता येतील असं टास्क फोर्सने राज्य सरकारला सल्ला दिला आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. पीडियाट्रिक टास्क फोर्स ने सुचवल्या काही उपाय योजना सुचवल्या आहेत. बोर्डिंग स्कुल म्हणजेच निवासी शाळा मध्ये येताना मात्र आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करावा असा सल्ला देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.