Home /News /mumbai /

सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी भाजपा सज्ज, महाराष्ट्रात राबवणार 'शिंदे पॅटर्न'

सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी भाजपा सज्ज, महाराष्ट्रात राबवणार 'शिंदे पॅटर्न'

सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. हा निकाल काहीही लागला तरी भाजपाचा प्लॅन रेडी आहे.

    मुंबई, 27 जून : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सध्या राजकीय संकटात (Maharashtra Political Crises) आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना आमदारांचा मोठा गट सध्या गुवाहाटीमध्ये मुक्कामाला आहे. या गटातील 16 आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नोटीस बजावली आहे. या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयत सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आपल्याला एकूण 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. त्यामधील 40 आमदार शिवसेनेचे आहेत. महाविकास आघाडी सरकार यापैकी 16 आमदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी त्यांना नोटीसह पाठवलीय. त्याला उत्तर देण्याचा शेवटचा दिवस आज (सोमवार) आहे. शिवसेना आणि शिंदे गटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपाचा प्लॅन रेडी राज्यात सुरू असलेल्या या सर्व राजकीय घडामोडीवर भाजपाचा लक्ष आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी भाजपा शासित राज्यात सध्या मुक्काम ठोकला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या सक्रीय झाले असून त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी भाजपाचा प्लॅन तयार आहे. एवढे आमदार सोडून गेले 16 च आमदारांवर कारवाई का? संजय राऊतांनी दिलं उत्तर मध्य प्रदेशात काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं. महाराष्ट्रातही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना हाताशी धरत हाच 'शिंदे पॅटर्न' भाजपा राबवण्याची शक्यता आहे. या आमदारांनी राजीनामा दिल्यास महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये येईल आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्याचा फायदा घेत भाजपा सरकार बनवण्याचा दावा करेल. राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये जास्तीत जास्त बंडखोर आमदार विजयी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: BJP, Maharashtra politics, Shivsena, Supreme court

    पुढील बातम्या