Home /News /mumbai /

महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

राज्यात सुरू असलेल्या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) महत्त्वाची बैठक गुरूवारी झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 मार्च : राज्यात सुरू असलेल्या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) महत्त्वाची बैठक गुरूवारी झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारवरील संकट टळलेलं नाही. सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे आहेत, असं मोठं वक्तव्य पवारांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकार जाण्याच्या तयारीत आहे, आमदारांनी विरोधी पक्षामध्ये बसण्याची तयारी ठेवावी, असा सल्लाही पवारांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपआपल्या मतदारसंघात जाऊ काम करावे. जनतेसमोर जाऊन आपले काम मांडावे. एकनाथ शिंदे यांच्या सरकार बनविण्याच्या दाव्याची वाट पहावी लागेल, असं पवारांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेच्या आमदारची मनपरिवर्तन होत काय यावर लक्ष ठेवावं असा सल्लाही पवारांनी या बैठकीत दिला आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यास विरोधी पक्षाची भूमिका कशी असावी यावरही या बैठकीत चर्चा झाली. 'शिवसेनेच्या बंडामागे भाजपा नाही'  शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही,असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे.  भाजपचा कुठलाही नेता किंवा मोठा चेहरा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जावून काहीतरी करतोय ते आतातरी दिसत नाहीय, असं अजित पवार म्हणाले. याबाबत पत्रकार पुढे प्रश्न विचारत असताना अजित पवारांनी 'मी मोठ्या नेत्याची गोष्ट करतोय', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. राज्यातील सत्तासंघर्षात TMC ची एन्ट्री, ममता दीदींनी दिली आमदारांना ऑफर! 'महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा देवून हे सरकार टिकवण्याचे प्रयत्न करणार आहे. मी दुपारी देखील मुख्यमंत्र्यांशी बोललो. आदित्य ठाकरे यांच्यासोबत बोललो. माझी मीडियाला विनंती करतो, या पेक्षा कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. शिवेसेनेत काही प्रश्न निर्माण झाली आहे. काही आमदार प्रमुख आलेले आहेत. त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. तिकडे जे आमदार आहेत त्यांना आवाहन करण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आमची भूमिका आघाडी सरकारला टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्या बाजूने आहेत', असा दावा अजित पवारांनी केला.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: NCP, Shivsena, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या