मुंबई, 9 जुलै : 2015 ते 2019 या काळात आपले फोन टॅप (Phone Tapping) केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session) नाना पटोले यांनी आपला फोन अनिष्ट राजकीय हेतून गैरपद्धतीने टॅप केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. केवळ आपलाच नाही तर इतर राजकीय नेत्यांचेही फोन टॅप केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच चौकशीची मागणी केली होती.
नाना पटोले यांनी केलेल्या या चौकशीच्या मागणीची दखल घेत गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचं जाहीर केलं आहे. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची सर्व वस्तुस्थिती पुढील अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे.
Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
त्रिसदस्यीय समितीची स्थापना (3 members panel to probe)
या फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती कठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष राज्याचे पोलीस महासंचालक असतील तर राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे आयुक्त आणि मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) हे दोन समितीचे सदस्य असणार आहेत.
2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी करुन उपरोक्त कालावधीत अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या काळात राज्यात भाजपची सत्ता होती आणि गृहमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Nana Patole, Phone