मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Coronavirus in Maharashtra: राज्यात कोविड 10 चा प्रादुर्भाव अद्यापही आटोक्यात आलेला नाहीये. तसेच या प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, 9 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) प्रभाव कमी झाला असला तरी दैनंदिन रुग्णसंख्या अद्यापही आठ हजारांच्या घरात असते. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यताही (possibility of third wave) वर्तवण्यात आली आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्य सरकारी कर्मचारी (Government Employees) आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. मात्र, सद्यस्थितीत राज्यात कोविड19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आला नसल्यानेत तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बदल्यांच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 2021-22 या चालू आर्थिक वर्षी मर्यादित स्वरुपात 14 ऑगस्ट 2021 पर्यंत बदल्या करण्यात याव्यात त्यानंतर कोणत्याही बदल्या करु नयेत असा निर्णय घेण्यात आला आहे.

BREAKING: राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यात म्हटले आहे की, कोविडमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असल्यामुळे बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित स्वरुपात करण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के एवढ्या मर्यादेत करण्यात याव्यात.

15 टक्के मर्यादेत सर्वसाधारण बदल्या करत असताना संबंधित पदावर विहित कालावधी पूर्ण झालेल्या सर्व पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी ज्यांचा संबंधित पदावरील जास्त कालावधी पूर्ण झाला आहे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्राधान्याने बदली करावी.

ओबीसी राजकीय आरक्षण: "फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला टाईमपास करायचाय" फडणवीसांनी सांगितलं कारण...

बदल्यांच्या संदर्भातील सर्व कार्यवाही ही 31 जुलै 2021 पर्यंत करण्यात यावी. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच जी पदे रिक्त राहतील केवळ अशा रिक्त पदांवर विशेष कारणास्तव बदल्या 1 ऑगस्ट 2021 ते 14 ऑगस्ट 2021 या कालावधीतपर्यंत कराव्यात.

विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 10 टक्के एवढ्या मर्यादेत करण्यात याव्यात असंही निर्णयात म्हटलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra