जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / LIVE: मनसेचा महामोर्चा.. राज ठाकरेंचं CAA ला जाहीर समर्थन

LIVE: मनसेचा महामोर्चा.. राज ठाकरेंचं CAA ला जाहीर समर्थन

LIVE: मनसेचा महामोर्चा.. राज ठाकरेंचं CAA ला जाहीर समर्थन

मुंबईमध्ये रविवारी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी मनसेने महामोर्चाचं आयोजन केलं आहे.मरीन ड्राईव्हहून मनसेच्या महामोर्चाला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे सहकुटुंब मोर्चात सहभागी झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबईमध्ये रविवारी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी मनसेने महामोर्चाचं आयोजन केलं आहे.मरीन ड्राईव्हहून मनसेच्या महामोर्चाला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे सहकुटुंब मोर्चात सहभागी झाले आहेत. गिरगाव ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. महामोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मोठ्यासंख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी पोहोचले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात