मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सारखा चश्मा घालून नाकाजवळ पडलेत काळे डाग? `हे` उपाय ठरतील फायदेशीर

सारखा चश्मा घालून नाकाजवळ पडलेत काळे डाग? `हे` उपाय ठरतील फायदेशीर

सतत चष्मा वापरल्यानं नाकाजवळ काळे डाग (Black marks) पडू लागतात. दिवाळीसारख्या सणाला नटून तयार होताना नितळ चेहऱ्यावर ते अगदी उठून दिसतात. हे व्रण कसे घालवायचे?

सतत चष्मा वापरल्यानं नाकाजवळ काळे डाग (Black marks) पडू लागतात. दिवाळीसारख्या सणाला नटून तयार होताना नितळ चेहऱ्यावर ते अगदी उठून दिसतात. हे व्रण कसे घालवायचे?

सतत चष्मा वापरल्यानं नाकाजवळ काळे डाग (Black marks) पडू लागतात. दिवाळीसारख्या सणाला नटून तयार होताना नितळ चेहऱ्यावर ते अगदी उठून दिसतात. हे व्रण कसे घालवायचे?

मुंबई, 3 नोव्हेंबर: दिवाळी आणि फेस्टिव्ह सीझनमध्ये छान तयार होऊन नटायची सगळ्यांची इच्छा असते. पण चश्मा वापरणाऱ्यांना एक कायमची चिंता सतावत असते. चश्मा काढला तर नाकावरचे डाग अगदी स्पष्ट दिसतात आणि काहींना तर सतत एका जागी  चश्म्याची खूण दिसते आणि लागतेही.

चष्मा (Spectacle) ही अनेकांसाठी गरजेची वस्तू असते. पूर्वी ज्यांना दृष्टिदोष असे किंवा जे वयस्कर असत अशा व्यक्तींना चष्म्याची गरज भासत असे; मात्र आता सर्व वयोगटातल्या व्यक्ती चष्मा वापरत असल्याचं दिसून येतं. सतत मोबाइल, लॅपटॉप, डेस्कटॉपचा वापर करणं किंवा टीव्ही पाहणं आदींमुळे चष्म्याचा वापर गरजेचा झाला आहे. ज्या लोकांची दृष्टी पहिल्यापासूनच कमकुवत आहे, जवळची किंवा लांबची वस्तू स्पष्ट दिसण्यास अडचण येते, त्यांना जास्त नंबरचा चष्मा सातत्यानं वापरावा लागतो. सतत चष्मा वापरल्यानं नाकाजवळ काळे डाग (Black marks) पडू लागतात. या डागांमुळे व्यक्तीचा चेहरा खराब दिसू लागतो. हे काळे डाग दिवसेंदिवस अधिकच गडद होत जातात. परंतु, हे डाग काही घरगुती उपायांनी दूर करता येतात. या उपायांची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

सातत्यानं चष्मा वापरल्यामुळे नाकाजवळ काळे डाग दिसू लागतात. यामुळे चेहरा काहीसा खराब दिसू लागतो. असे डाग दिसल्यावर आपण बाजारात उपलब्ध असलेली क्रीम्स (Creams) किंवा लोशन (Lotion) त्यावर लावतो; मात्र यामुळे हे डाग अधिकच गडद होऊन चेहरा अधिकच खराब दिसण्याची शक्यता असते; मात्र असे काही घरगुती उपाय आहेत की ज्यामुळे हे डाग नाहीसे होऊ शकतात.

त्वचेशी संबंधित उत्पादनांमध्ये बदामाचा (Almond) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण त्यात ई व्हिटॅमिन (E Vitamin) मुबलक असतं. ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचं पोषण होतं. त्यामुळे असे डाग घालवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री 2 ते 3 बदाम पाण्यात भिजत टाकावेत. दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तयार करून त्यात गुलाबपाणी, लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ते मिश्रण नाकाभोवती, तसंच संपूर्ण चेहऱ्यावर लावावं. अर्धा तासानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. तसंच नाकाच्या आसपास ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्यावर बदाम तेलानं हलकं मालिश करू शकता.

त्वचेशी निगडित अनेक समस्यांवर काकडी (Cucumber) अत्यंत गुणकारी आहे. चेहऱ्यासाठी तर काकडी अधिक फायदेशीर ठरते. चेहऱ्यावरची घाण स्वच्छ करण्यासाठी काकडीचा वापर केला जातो. काकडीचा रस चष्म्यामुळे पडलेल्या काळ्या डागांवर लावावा. काकडीचे तुकडे करून त्याने डाग असलेल्या ठिकाणी हलकं मालिश करावं. याशिवाय एक चमचा काकडीच्या रसात एक चमचा बटाटा आणि एक चमचा टोमॅटोचा रस एकत्र करून हे मिश्रण हलक्या हातांनी डागांवर लावावं. थोड्या वेळानं चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या, टॅनिंग आदी कमी होण्यास मदत होते.

कोरफडीची (Aloe vera) जेल बोटावर घेऊन चष्म्यामुळे ज्या ठिकाणी काळे डाग पडले आहेत, तिथं हलक्या हाताने लावावं. 10 मिनिटं मालिश केल्यानंतर चेहऱ्यावरचं जेल काही काळ सुकू द्यावं आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवावा. या उपायामुळेदेखील नाकाजवळचे काळे डाग जातात.

First published:

Tags: Beauty tips, Diwali 2021, Diwali Fashion, Health Tips, Home remedies