मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एवढ्या कोटींची आहे संपत्ती!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एवढ्या कोटींची आहे संपत्ती!

उद्धव ठाकरे हे पहिल्यादांच निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे प्रत्येकाला आपली संपत्ती किती आहे याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं.

  • Share this:

मुंबई 11 मे: विधान परिषद निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला अर्ज अखेर दाखल केला आहे. तसंच सेनेकडून नीलम गोऱ्हे यांनीही आपला अर्ज सादर केला आहे.विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उद्धव ठाकरे हे पहिल्यादांच निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे प्रत्येकाला आपली संपत्ती किती आहे याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. त्यानुसार त्यांनीही प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे 125 कोटींची संपत्ती असल्याचं दाखविण्यात आलं आहे.

ठाकरे घराण्यातून आत्तापर्यंत कुणीच निवडणूक लढली नाही. आदित्य ठाकरेंनी ती प्रथा मोडत पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि आता उद्धव ठाकरे ही परिषदेची निवडणूक लढवत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही मुलं यावेळी हजर होते.

उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 3 बंगले आहेत. वांद्रे इथल्या कलानगरमध्ये असलेला मातोश्री, त्याच्याच शेजारचा नवा मोतोश्री बंगला आणि कर्जत इथे फार्म हाऊस आहे. एकूण 125 कोटींची संपत्ती असलेल्या ठाकरे यांच्या मालकीचं एकही वाहन नाही.

देशाला कोरोनाच्या संकटात ढकलून मोदी सरकारनं हात केले वर, काँग्रेसनं साधल शरसंधान

विविध कंपन्यांचे असलेले शेअर्स, बँकेमधल्या ठेवी, कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी हा आपल्या उत्पन्नाचा स्रोत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ठाकरे यांच्याविरुद्ध एकूण 23 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 12 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत तर इतर या तक्रारी असल्याचं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढविताना त्यांच्याकडे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यात 10 कोटी 36 लाखांच्या बँकेंमध्ये असलेल्या ठेवी, 64 लाख 65 हजारांचे दागिणे आणि एक BMW कार आहे असं म्हटलं होतं.

भारतात 26/11 मुंबई सारख्या हल्ल्याचा पाकिस्तानचा कट, दाऊदशी बांधलं संधान

आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे.  पण त्या पूर्वीच विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीचे 5 आणि भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार रिंगणात असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करेल.

 

 

 

First published: May 11, 2020, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading