मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भारतात 26/11 मुंबई सारख्या हल्ल्याचा पाकिस्तानचा कट, दाऊदशी बांधलं संधान

भारतात 26/11 मुंबई सारख्या हल्ल्याचा पाकिस्तानचा कट, दाऊदशी बांधलं संधान

भारतीय सुरक्षा यंत्रणा सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यात गुंतलेल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन भारतातल्या काही शहरांमध्ये असे हल्ले घडविण्याची योजना पाकिस्तान आखत आहे.

मुंबई 11 मे: सर्व जग कोरोनाशी लढत असतानाच पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना तयार करत आहे. लष्करे ए तोयबा ही दहशतवादी संघटना दाऊदला हाती धरून ISIच्या मदतीने भारतात हल्ल्याची योजना तयार करत असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. 2008मध्ये मुंबईवर कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तशाच प्रकारच्या हल्ल्याचा कट असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला रविवारी त्याच्या फार्महाऊसवर ट्रेस करण्यात आलं होतं. ISISचे अधिकारी, लष्कर ए तोयबाचे कमांडर आणि दाऊदची बैठक झाली. समुद्री मार्गाने भारतात लष्कर ए तोयबा शस्त्रपुरवढा करणार आहे. भारतात दाऊदचं जे नेटवर्क आहे त्याच्या मदतीने अशा प्रकारचे हल्ले करण्याचा डाव आखला जात आहे.

भारतीय सुरक्षा यंत्रणा सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यात गुंतलेल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन भारतातल्या काही शहरांमध्ये असे हल्ले घडविण्याची योजना पाकिस्तान आखत आहे.

चालत गावी निघालेल्या महिलेने रस्त्यातच दिला बाळाला जन्म, प्रसूतीनंतरही...

तोयबचा दुसऱ्या क्रमांकाचा कमांडर अब्‍दुल रहमान म‍क्‍की याने कराचित जावून दाऊदची भेट घेतली असल्याचं पुढं आलं आहे. त्या भेटीतच कट शिजल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Lockdown: बँक खात्यात जमा झाले लाखो रुपये, घाबरून लोकांनी गाठलं पोलीस स्टेशन

गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे हल्ले वाढले आहेत. सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहीद्दीनचा कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केल्याने दहशतवादी संघटनांना हादरा बसला होता.

First published:

Tags: Dawood ibrahim