जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / MLC Election: विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट

MLC Election: विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट

MLC Election: विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट

MLC Election: विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट

Maharashtra MLC Election 2022: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश नाहीये.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जून : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (MLC Election 2022) भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर (BJP release names of candidates for Vidhan Parishad election) केली आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचा समावेश नाहीये आणि पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही विधानपरिषदेवर संधी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत उमा खापरे यांच्या नावाचा समावेश करुन सर्वांनाच भाजपने एक झटका दिला आहे. भाजपने ज्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांच्या नावांचा समावेश आहे. काय म्हणाले चंद्रकांत पाटील ? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड अशी नावे केंद्र भाजपने घोषित केले आहेत. या सर्व उमेदवारांची अर्ज आज आम्ही भरणार आहोत. आमच्या पार्टीत आम्ही सर्व जण कोऱ्या पाकीटासारखे असतो. जो पत्ता लिहिल तिकडे जात असतो. राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते पण निर्णय शेवटी संघटना करते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेच्या उमेदवारांचा निर्णय केंद्रातून होतो. पंकजा ताईंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले पण केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल. चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं, पंकजा ताई या ऑलरेडी ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत. मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर मध्यप्रदेश हे मोठं राज्य आहे आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जसं आपण पाण्यातून एखादं जहाज अचानक क्रेनने उचललं तर त्यामुळे निर्माण झालेला खड्डा पडतो तो अवघ्या काही सेकंदांत भरला जातो. तशाच प्रकारे नाराजी सुद्धा त्या पाण्यातील खड्ड्याप्रमाणे क्षणभराची असते. इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि निवड न झाल्याने नाराजी व्यक्त करणं यात काही चुकीचं नाहीये असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. वाचा : विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून दोन नावं ठरली; सेनेच्या दिग्गज मंत्र्याला मंत्रिमंडळातून डच्चू? एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या आमदारांचा संपला कार्यकाळ रामराजे निंबाळकर सुभाष देसाई प्रविण दरेकर प्रसाद लाड सदाभाऊ खोत संजय दौंड विनायक मेटे दिवाकर रावते शिवसेनेचे दोन उमेदवार जाहीर शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी यांच्या नावांची घोषणा केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचं पूर्नवसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. तर आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात आणि काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेचा धणुष्यबाण तळागाळात पोहचवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात