• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Maharashtra Lockdown updates: राज्यातील लॉकडाऊन 14 दिवस वाढणार?, विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

Maharashtra Lockdown updates: राज्यातील लॉकडाऊन 14 दिवस वाढणार?, विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अद्यापही असल्याने राज्यातील निर्बंध वाढवण्याचे संकेत मिळत आहेत.

  • Share this:
मुंबई, 27 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येचा वेग थोडा कमी झाला असला तरी मात्र, मृतकांचा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. तसेच आता लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळेच (Strict Restrictions) बाधितांच्या संख्येला ब्रेक लागू शकला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आता पुढील काही दिवस सुद्धा राज्यात कठोर निर्बंधल लागू करण्यात यावेत अशी भूमिक राज्य सरकारमधील (Maharashtra Government) अनेक मंत्र्यांनी घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कठोर निर्बंध आणखी 14 दिवस वाढणार उद्या म्हणजेच 28 एप्रिल 2021 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. बहुतेक कॅबिनेट मंत्री यांनी सध्या सुरू असलेला राज्यातील लांकडाऊन कालावधी 14 दिवस वाढवावे अशी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री यांची भूमिका लांकाडऊन कालवधी वाढवावा अशीच भूमिका मांडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वाचा: 1 मे पासून 18+ नागरिकांना लस देण्याचे प्रयत्न, ठाकरे सरकारने Serumकडे केल्या 'या' दोन मागण्या कोरोना बाधितांची संख्या मुंबईत कमी होत आहे. पण राज्यातील इतर शहरांत अद्याप कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. यामुळे सध्याच्या लॉकडाऊन कालवाधी पुन्हा वाढवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही दिले आहेत. राज्यात दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Published by:Sunil Desale
First published: