Home /News /mumbai /

1 मे पासून 18+ नागरिकांना लस देण्याचे प्रयत्न, ठाकरे सरकारने Serumकडे केल्या 'या' दोन मागण्या

1 मे पासून 18+ नागरिकांना लस देण्याचे प्रयत्न, ठाकरे सरकारने Serumकडे केल्या 'या' दोन मागण्या

Covid-19 Vaccination: देशभरात 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोविड-19 लस देण्यात येणार आहे. मात्र, लशींच्या तुडवड्यामुळे या लस मोहिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

    मुंबई, 27 एप्रिल: कोरोनाच्या या संकटात कोविड प्रतिबंधक लस (Covid-19 vaccine) ही फारच महत्वाची आहे. त्यामुळे येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांन कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास पात्र असणार आहेत. मात्र, महाराष्ट्रात लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित आहेत. त्याच दरम्यान ही लसीकरण मोहिम सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारचे (Maharashtra) प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारने सीरमला (Serum Institute of India) एक पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं, केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देत 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महाराष्ट्राला 12 कोटी लशींचे डोस आवश्यक असणार आहेत. त्यामुळे 1 मे 2021 पासून ते पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत आपण महाराष्ट्राला दरमहा किती कोविशिल्ड लशींचा (Covishield Vaccine) पुरवठा करु शकता याबद्दल आम्हाला कळवावे. यासोबतच कोविशिल्ड लसीची किंमत किती असेल आणि इतर काही अटी असतील याचीही माहिती द्यावी असं पत्रात म्हटलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या लशींचा पुरवठा हे मोठं आव्हान आहे. लसीकरणासाठी राज्य सरकार तयार आहे. 7 हजार कोटींची लस लागणार आहे. त्यासाठी सीरम संस्था आणि भारत बायोटेकसोबत पत्र व्यवहार केला आहे. पण अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाहीये. त्यामुळे 1 तारखेला लसीकरण कसे करावे हा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक लसीकरण सोमवारी (26 एप्रिल 2021) महाराष्ट्राने सायंकाळी सहावाजेपर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी 3 एप्रिल रोजी राज्यात 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Maharashtra

    पुढील बातम्या