मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?

BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?


राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

मुंबई, 25 मे : राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे आता  विधान परिषदेच्या 10 जागांसाठी (Maharashtra Legislative Council election) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  पुढील महिन्यात 20 जूनला 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण १० जागांसाठी निवडणूक होणार आहे.  विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

भाजपकडून प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड,  विनायक मेटे यांना उमेदवारी दिली होती. सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल करत आहे. सदाभाऊ खोत यांनी अनेक आंदोलनातून कायम चर्चेत राहिले आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना पुन्हा संधी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

(दादरमधील पार्किंगची समस्या मिटणार व्हॅले पार्किंग संकलपनेला सुरुवात)

तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहे. सध्या ते विद्यमान सभापती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडे सदस्य संख्या पाहता नवीन रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(राहुल द्रविडऐवजी हा दिग्गज असणार टीम इंडियाचा कोच, BCCI ची घोषणा)

विधान परिषदेची निवडणुकीसाठी विधान परिषदेचे सदस्य मतदान करत असतात. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 मतांची गरज असते. भाजपकडे मित्रपक्ष मिळून 113 जागा आहे. त्यामुळे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.तर महाविकास आघाडी पक्षाकडून कोणत्या नेत्याला संधी मिळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

या आमदारांचा संपला कार्यकाळ

रामराजे निंबाळकर

सुभाष देसाई

प्रविण दरेकर

 प्रसाद लाड

सदाभाऊ खोत

संजय दौंड

विनायक मेटे

दिवाकर रावते

First published:
top videos