उद्या ठरणार CORONIL चं भवितव्य; केंद्राकडून सशर्त विक्रीला परवानगी; हायकोर्टात बंदीची मागणी

उद्या ठरणार CORONIL चं भवितव्य; केंद्राकडून सशर्त विक्रीला परवानगी; हायकोर्टात बंदीची मागणी

CORONIL बाबत उत्तराखंडमधील हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी कोर्टाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

  • Share this:

सुनील नवप्रभात/वीरेंद्र बिष्ट, डेहराडून, 30 जून : योगगुरू बाबा रामदेव (baba ramdev) यांच्या पतंजलीने (patanjali) तयार केलेल्या कोरोनिल (coronil) हे औषध अजूनही वादात अडकलं आहे. एकिकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती (immunity booster) वाढवणारं औषध म्हणून या औषधाच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे या औषधावर बंदी घालावी, अशी मागणी उत्तराखंडच्या उच्च न्यायालयात (high court) करण्यात आली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि स्पष्टीकरण मागितलं आहे.

23 जूनला रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केलं. या औषधामुळे कोरोना शंभर टक्के बरा होतो, असा दावाही केला. यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालय आणि उत्तराखंडच्या आयुष विभागाने पतंजलीला नोटीस बजावली.

या नोटिसीला उत्तर देताना पतंजली आयुर्वेदनेदेखील आपण कोरोनाचं औषध बनवल्याचा दावा केलाच नाही, असं म्हणत यू-टर्न घेतला, मात्र आपलं औषधाने कोरोनावर उपचार करता येऊ शकतात असं सांगितलं.

हे वाचा - VIDEO : मास्क लावायला सांगितलं म्हणून दिव्यांग महिलेला केली मारहाण

यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या दिव्य योग फार्मसीला हे औषध इम्युनिटी बुस्टर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध म्हणून विक्री करण्यास सशर्त परवानगी दिली, त्यावर कोरोनाचा उल्लेखही नसावा असं सांगितलं. शिवाय आयुष मंत्रालयाच्या गाइ़डलाइन्सनुसार औषधाचं क्लिनिकल ट्रायलही सुरू ठेवण्यास मंजुरी दिली.

हे वाचा - नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे, नियमांच्यावर पंतप्रधानसुद्धा नाही - PM मोदी

तर दुसरीकडे कोरोनिलविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या औषधाला बाजारात बंदी घालावी अशी मागणी केली आहे. औषध कंपनीने आयसीएमआरच्या गाइडलाइन्सचं पालन केलं नाही आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाची परवानगी घेतलेली नाही. शिवाय उत्तराखंड आयुष विभागानेही कोरोना औषधासाठी परवानगी दिलेली नाही. तसंच ज्या राजस्थानच्या निम्स रुग्णालयात या औषधाचं ट्रायल घेतल्याचं सांगितलं जातं आहे, त्यांनीदेखील आपण अशा औषधाचं क्लिनिकल ट्रायल केलं नसल्याचं सांगतिलं. असं या याचिकेत म्हटलं आहे.

हे वाचा - कोरोनाचं संकट वाढलं, नाशिकमध्ये लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्णय

त्यामुळे औषधाची विक्री थांबवण्याची आणि खोटा प्रचार केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून बुधवारी स्पष्टीकरण मागितलं आहे. आता केंद्र सरकारने या औषधाच्या विक्रीला परवागनी दिली आहे. उद्या सरकार कोर्टात काय स्पष्टीकरण देईल ते महत्त्वाचं असेल.

संपादन - प्रिया लाड

First published: June 30, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या