महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी, निकालाआधीच युतीमध्ये सुरू झाले मतभेद!

maharashtra Election Result 2019 LIVE: आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. पण त्याआधीच मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 09:17 AM IST

महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी, निकालाआधीच युतीमध्ये सुरू झाले मतभेद!

मुंबई, 24 ऑक्टोबर : आदित्य ठाकरे हे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवे असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. पण त्याआधीच मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. यासाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून निकाल हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सगळ्यांचं लक्ष असलेल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. त्यासंबधी संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली असता आम्हाला आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर बुधावरी दिलेल्या मुलाखतीमध्येही शिवसेना 100हून जास्त जागांवर जिंकेल. आणि भाजप आमच्याशिवाय सरकार आणू शकणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

खरंतर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2014 च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले. आता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाचा आदित्य ठाकरेंना किती फायदा होतो हे या लढतीमध्ये कळेल.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पक्षाच्या वतीने बोलण्याऱ्या 18 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत असलेले नेतेच पक्षाची भूमिका मांडतील आणि पक्षाच्या मुद्यांवर प्रतिक्रिया देतील. प्रसारमाध्यमांनीही या यादीत असलेल्या अधिकृत प्रवक्त्यांकडूनच प्रतिक्रिया घ्याव्यात, अशी विनंती हर्षल प्रधान यांनी केली आहे.

इतर बातम्या - Parli Election Result 2019 LIVE: परळीतून बाजी पलटली, धनंजय मुंडे आघाडीवर

या यादीत अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, विशेषा राऊत, भावना गवळी, राहुल शेवाळे, धैर्याशील माने, अनिल परब, मनीषा कायंडे आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे. या नेत्यांसोबतच सुरेश चव्हाण, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्ग, किशोर कान्हेरे, शितल म्हात्रे आणि शुभा राऊल हे पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहतील. तसेच, एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही माध्यमांशी बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

Loading...

दरम्यान, याआधी राज्यसभेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर अनेकवेळा टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रवक्तेपद जबाबदारी काढून घेतल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती केली आहे.

वरळी विधानसभा निवडणूक 2014 निकाल

सुनील शिंदे, शिवसेना - 60 हजार 625

सचिन अहीर, राष्ट्रवादी - 37 हजार 613

इतर बातम्या - Assembly Elections: Maharashtra Election Result 2019 LIVE: सर्वात मोठी बातमी- सातारा लोकसभा पोटनिवडणूक: उदयनराजे भोसले पिछाडीवर

हा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

1962 – माधव नारायण बिरजे (काँग्रेस)

1967 – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

1972 – शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1978 - प्रल्हाद कृष्णा कुरणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी)

1980 - शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1985 - विनिता दत्ता सामंत (अपक्ष)

1990, 1995, 1999, 2004 - दत्ताजी नलावडे (शिवसेना)

मतदारसंघ पुनर्रचना

2009 – सचिन अहिर (राष्ट्रवादी काँग्रेस)

2014 – सुनील शिंदे ( शिवसेना)

वरळी विधानसभा मतदारसंघाचा Exit Poll

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या  Exit Poll चा निकाल सांगतो. हाती लागलेल्या Exit Poll नुसार वरळी मतदारसंघामध्येआदित्य ठाकरे बाजी मारणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पहिल्यांदाच विधानसभेत उमेदवारी मिळवणारे आदित्य ठाकरे बाजी मारणारील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 09:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...