मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्य सरकारशी मतभेद, पोलीस महासंचालक जयस्वाल महाराष्ट्र सोडून केंद्रात जाण्याची शक्यता

राज्य सरकारशी मतभेद, पोलीस महासंचालक जयस्वाल महाराष्ट्र सोडून केंद्रात जाण्याची शक्यता

Maharashtra DGP मुंबईवरचा 26/11चा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे.

Maharashtra DGP मुंबईवरचा 26/11चा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे.

Maharashtra DGP मुंबईवरचा 26/11चा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे.

मुंबई 7 नोव्हेंबर: राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल (Maharashtra Director General of Police (DGP) Subodh Jaiswal) यांचे राज्य सरकारसोबत मतभेद झाले आहेत. सरकार महत्त्वाचे निर्णय घेताना विचारात घेत नसल्याने ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जयस्वाल यांनी राज्य सरकारला पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. ते पुन्हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात प्रामाणिक अधिकाऱ्यांना किंमत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईवरचा 26/11चा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे. 10 वर्ष ‘रॉ’ (Research & Analysis Wing (R&AW) या देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गुप्तचर संस्थेत काम केल्यानंतर काही वर्षांपूर्वी जयस्वाल हे जून 2018मध्ये राज्यात परत आले होते. ते 1985च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांचे सरकारशी फारसे सलोख्याचे संबंध राहिले नाहीत असं बोललं जातं. बदल्या, नियुक्त्या, पुनर्नियुक्त्या आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय घेताना आपल्याला डावललं जात असल्याचं त्यांचं मत झालं होतं. त्यानंतर त्यांनी संबंधितांकडे नाराजीही व्यक्त केली. मात्र त्यानंतरही त्यात काही बदल झाला नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सोडून पुन्हा केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला असं बोललं जातं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ट्विट करून त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी तब्बल 22व्या मजल्यावर लटकला चोर; पाहा VIRAL VIDEO पाटील म्हणाले, काही वेळापूर्वीच एक धक्कादायक आणि दुःखद बातमी वाचली. राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सुबोध कुमार जयस्वाल जी हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. सरकार इतकी बहिरी आणि कुचकामी आहे की, पोलीस दलाला मजबूत करण्यासाठी जयस्वाल यांच्या सर्व सूचना आणि उपाययोजना धुडकावून लावत होती. याशिवाय त्यांच्या शिफारसीच्या विरुद्ध पुर्वीच्या ज्या पोलिसांना निलंबित केले गेले होते त्यांनाही पुन्हा पदावर नेमले गेले. US Election 2020 : बायडन- कमला हॅरिस यांच्याशी संबंध वाढवण्यासाठी मोदींचा प्लॅन आमच्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हा फारच घातक दिवस आहे की, त्यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली होती. कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल? सुबोध कुमार जयस्वाल - जयस्वाल हे या आधी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. ते सध्या राज्याचे पोलीस महासंचलाक आहेत. केंद्रात आणि रॉमध्येही त्यांनी काम केलंय. सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी RAW आणि IB या  गुप्तचर संस्थेत 10 वर्ष महत्त्वाच्या पदावर काम केलंय. त्यांना केंद्रातही सचिवपदावर काम करण्याचा अनुभव आहे. 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते सहभागी होते. मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले होतं
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Maharashtra police, Mumbai police

पुढील बातम्या