मुंबई, 07 एप्रिल : राज्यात कोरोनाचे (maharashtra corona update) संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patient) नोंद झाली आहे. राज्यात मागील 24 तासांत तब्बल 59,907 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 322 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. राज्य्यात साठ हजारांच्या आसपास कोरोना रूग्ण नवीन आढळून आले आहे तर 322 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 लाखांच्यावर अॅक्टीव्ह केसेस आहे.
पेट्रोलची किंमत वाढली तरी नो टेन्शन; ओंकारने तयार केली अनोखी Electric Activa
आज 30,296 रुग्ण बरे होऊन घरी परते. राज्यात आजपर्यंत एकूण 26,13,627 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.36% एवढे झाले आहे.
आज राज्यात 59,907 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 322 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.79% एवढा आहे.
कोरोना लशीमुळेच रक्ताच्या गुठळ्या होतायेत? EU Drug Regulator ने दिली मोठी माहिती
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,11,48,736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31,76,261 (15.00 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25,78,530 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,212 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर राज्यात आज रोजी एकूण 5,01,559 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारला फटकारले
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आपली भूमिका पत्राद्वारे प्रसिद्ध केली आहे. या पत्रात हर्षवर्धन यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली. केंद्रीय चमू पाठविल्या. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले, याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत, तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रूग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत, अशी टीका आरोग्यमंत्र्यांनी केली.
'आतापर्यंत मी गप्प राहिलो. पण, माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावे लागते आहे. राजकारण करणे हे नेहमीच सोपे असते. पण, सुशासन आणि आरोग्य सुविधांचे निर्माण ही खरी क्षमतेची परीक्षा असते' अशा शब्दांत आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला फटाकरून काढले.
'महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे, असं आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिले.