मुंबई, 31 मे : राज्यात 1 जूनपासून काही प्रमाणात निर्बंध शिथील होत (Lockdown) आहेत. राज्यातील कोरोनाचे आकडे दिलासादायक असून स्थिती सुधारत असल्यानं प्रशासन दिलासादायक निर्णय घेत आहे. सोमवारीही राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे आकडे (Corona Numbers) दिलासादायक असल्याचं पाहायला मिळालं आहे. सोमवारी राज्यात 15 हजार 077 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा यापेक्षा जवळपास दुप्पट म्हणजे 33 हजारांच्या वर गेला. (वाचा- कोव्हिशिल्डचा फक्त एकच डोस दिला जाणार? लवकर लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता ) कोरोनाच्या समाधानकारक आकडेवारीमुळं संपूर्ण राज्यात दिलासादायक स्थिती असल्याचं चित्र आहे. काही जिल्हे अजूनही याला अपवाद असले तरी प्रशासनाच्या वतीनं त्याठिकाणीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोमवारचा विचार करता राज्यात दिवसभरात नवे 15 हजार रुग्ण सापडले आहेत. तर 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचा आकडाही 200 च्या आत आल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात सोमवारी कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 184 एवढा आहे. राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही अडीच लाखांवर आला आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.88 टक्के झालं आहे. (वाचा- diABZI चा फक्त एकच डोस पुरेसा; कोरोनाला गंभीर रूप धारण करण्यापासून रोखणार हे औषध ) मुंबईत दिवसभरात 676 नवे रुग्ण आढळले तर 5570 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केल्याप्रमाणे पुढचे 15 दिवस Lockdown निर्बंध राहणार आहेत. या काळात मुंबईत थोड्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने 1 ते 15 जून दरम्यान काय नवे नियम असतील आणि कुठले निर्बंध शिथिल होतील यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. पुण्यातही कोरोनाची आकडेवारी समाधारकारकरित्या कमी झालेली पाहायला मिळालं आहे. त्यामुळंच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावलेले अनेक निर्बंध पुण्यात शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यात सोमवारी नवे अवघे 180 रुग्ण आढळले. तर 751 रुग्णांनी मात केली मात्र मृतांचा आकडा 24 एवढा असल्याचं पाहायला मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.