मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

diABZI चा फक्त एकच डोस पुरेसा; कोरोनाला गंभीर रूप धारण करण्यापासून रोखणार हे औषध

diABZI चा फक्त एकच डोस पुरेसा; कोरोनाला गंभीर रूप धारण करण्यापासून रोखणार हे औषध

कोरोना रुग्णांना स्टेरॉईड देणं घातक

कोरोना रुग्णांना स्टेरॉईड देणं घातक

diABZI हे औषध इतर श्वसनसंबंधी कोरोनाव्हायरसवर उपचारासाठीही फायदेशीर आहे.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 31 मे : कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) वेगवेगळी औषधं (Corona medicine) शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. नुकतंच कोरोनावर प्रभावी असं आणखी एक औषध (Corona drug) सापडलं आहे. या औषधामुळे कोरोनाव्हायरसला गंभीर स्वरूपात जाण्यापासून रोखता येऊ शकतं. तसंच हे औषध इतर श्वसनसंबंधी कोरोनाव्हायरसवर उपचारासाठीही फायदेशीर आहे. विशेष म्हणजे या औषधाचा फक्त एकच डोस पुरेसा आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोनावर असं औषध शोधून काढलं आहे, जे रोगप्रतिकारक क्षमतेला चालना देतं.  diABZI (डायएबीझेडआय) असं या औषधाचं नाव आहे. हे औषध शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमतेला सक्रिय करतं.  सायन्स इम्युनोलॉजी जर्नलमध्ये हे संंशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे वाचा - फक्त 45+ लोकांनाच मोफत कोरोना लस का?; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं अनेक औषधांचं परीक्षण करण्यात आलं, त्यात डायएबीझेडआय औषध प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सध्या या औषधाचे कॅन्सरवरील उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.  संशोधकांना दिसून आलं की, हे औषध श्वसनमार्गातील पेशींमध्ये रोगप्रतिकारक प्रणाली अॅक्टिव्ह करू शकतं आणि कोरोना संक्रमणाला गंभीर होण्यापासून रोखतं. कोरोना संक्रमित उंदराला हे औषध देण्यात आलं, तेव्हा त्याच्या फुफ्फुसातील संसर्ग खूप कमी झाला. तसंच वजन कमी होण्याचं प्रमाणही घटलं. हे वाचा - मास्क घालाल तर दंड, लशीचं तर नावही काढायचं नाही; कोरोना काळात इथं विचित्र नियम अमेरिकेतील पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक सारा चैरी यांनी सांगितलं, सार्स-कोविड-2 आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी अँटिव्हायरल विकसित करण्याची तात्काळ गरज आहे. कारण या व्हायरसत एकामागोमाग एक खतरनाक रूप समोर येत आहेत. diABZI हे औषध एकाच डोसमध्ये प्रतिकारक क्षमता सक्रिय करतं त्यामुळे व्हायरस नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे औषध B.1.351 या दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या स्ट्रेनवरही प्रभावी आहे. या स्ट्रेनमुळे जगभरात चिंता वाढली आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या