मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Corona मुंबई, पुण्याच्या तुलनेत इतर काही जिल्ह्यांचे आकडे चिंताजनक, अहमदनगरमध्ये तब्बल 35 मृत्यू

Corona मुंबई, पुण्याच्या तुलनेत इतर काही जिल्ह्यांचे आकडे चिंताजनक, अहमदनगरमध्ये तब्बल 35 मृत्यू

Maharashtra 27th May Corona अहमदनगरमध्ये दिवसभरात 1400 अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. तसंच याठिकाणी मृतांचा आकडाही 35 एवढा आहे. तर कोल्हापुरातही 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर साताऱ्यात 2500 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.

मुंबई, 27 मे : राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं चित्र अजूनही कायम आहे. रुग्ण संख्या हळू हळू कमी होत असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. राज्या गुरुवारी 21 हजार 273 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा दिलासादायक आहे. मात्र दिवसभरात 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra corona news)

(वाचा-हैराण करणारा प्रकार; आईचा रिपोर्ट निगेटिव्ह, मात्र जन्मजात मुलीचा पॉझिटिव्ह)

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट हा 93.02 टक्के एवढा झाल्याचं गुरुवारी समोर आलं. गुरुवारी राज्यभरातून 34 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत राज्यातील 52 लाख 76 हजार 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं रिकव्हरी रेट वाढला आहे. नव्या कोरोना रुग्णांचा विचार करता गुरुवारी राज्यात नव्या 21 हजार 273 रुग्णांची भर पडली.

राज्यात गुरुवारी कोरोनामुळं दुर्दैवी मृत्यू झालेल्या मृतांचा आकडा हा 425 आहे. त्यामुळं सद्या राज्यातील कोरोनामुळं होणारा मृत्यूदर 1.63 टक्के आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा 3 लाख 1 हजार 41 एवढा आहे.

(वाचा-Pune : कोरोनाच्या संकटामुळं दिव्यांगांना नैराश्याचा घेराव, केलं भीक मांगो आंदोलन)

मुंबईत मात्र नवे कोरोना रुग्ण हे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांपेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत गुरुवारी 1266 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा 855 एवढा आहे. तर दिवसभरात 36 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. तर पुण्यामध्ये गुरुवारी 588 नवे रुग्ण आढळले तर 921 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर दिवसभरात एकूण 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

उर्वरित राज्याचा विचार करता अहमदनगर आणि कोल्हापूरनं राज्याच्या चिंता वाढवल्या आहेत. अहमदनगरमध्ये दिवसभरात 1400 अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. तसंच याठिकाणी मृतांचा आकडाही 35 एवढा आहे. तर कोल्हापुरातही 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर साताऱ्यात 2500 पेक्षा अदिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं मुंबई पुण्यातून दिलासा मिळताना इतर काही जिल्ह्यांचा वेग मात्र आणखी कमी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Maharashtra