कोरोनाची दुसरी लाट जितकी धोकादायक आहे तितकीच हैराण करणारीही आहे. वाराणसी येथील एका रुग्णालयातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
2/ 6
या रुग्णालयातील एक नवजात मुलगी कोविड पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे या मुलीच्या आईची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
3/ 6
रुग्णालयातील डॉक्टरांनी ही रेअर केस मानली असून आईची पुन्हा आरीपीसीआर टेस्ट करणार असल्याचं सांगितलं आहे.
4/ 6
अनिल कुमार यांच्या 26 वर्षीय गर्भवती पत्नीवर बीएचयूमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान 25 मे रोजी डिलिव्हरीची तारीख नक्की करण्यात आली होती. यापूर्वी डॉक्टरांनी कोविड टेस्ट केली.
5/ 6
मुलीच्या जन्मानंतर तिचीही कोविड टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह होती. यानंतर सर्वजण हैराण झाले. आई व बाळाची प्रकृती ठीक असून पुन्हा एकदा दोघांची टेस्ट करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
6/ 6
याबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की, आरटी-पीसीआरची सेंसिटीव्हीटी 70 टक्क्यांपर्यंत असते. पुन्हा एकदा टेस्ट करण्यात येईल. गरज पडल्यास आईची अँटीबॉडी टेस्टही केली जाईल. त्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल.