राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजार पार, पण बरे होण्याचे प्रमाणही वाढले

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजार पार, पण बरे होण्याचे प्रमाणही वाढले

आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान झले आहे. तर आज 349 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

  • Share this:

 

मुंबई, 15 एप्रिल : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज कोरोनाबाधित (maharashtra corona case) रुग्णांची संख्या ही 50 हजार पार करत आहे. आजही राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 60 हजार नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज राज्यात 53,335 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. तर आजपर्यंत एकूण 29,59,056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.3 एवढा झाला आहे.

मृतदेहांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रे लावून झाकले लखनऊचे 'वैकुंठ धाम'

आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान झले आहे. तर आज 349 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 63 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,30,26,652 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 36,39,855 (15.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,87,478 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 27,273 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज एकूण 6,20, 060 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

निर्बंध आणखी कडक होणार!

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्य सरकारकडून 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, अजूनही लोकं लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कुंभमेळ्यात निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन

राज्यात लॉकडाऊन 2.0 लागू केल्यानंतर लोकांनी थट्टा मस्करी करत नियम पायदळी तुडवत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकं नियमांचं उल्लंघन करून गर्दी करत आहेत.

त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. कोविड 19 संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ज्या अटी शिथिल करण्यात आल्या आहे, त्या बंद करण्याची शक्यता आहे.

Published by: sachin Salve
First published: April 15, 2021, 9:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या