मराठी बातम्या /बातम्या /देश /कुंभमेळ्यात निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन

कुंभमेळ्यात निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. हरिद्वारमध्ये गेल्या 72 तासांमध्ये दीड हजारांहून अधिक केसेस समोर आल्या आहेत.

भोपाळ, 15 एप्रिल : हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात मध्य प्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कंपिल देव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामंडलेश्वर कपिल देव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना देहरादूर येथील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. (Mahamandleshwar Kapil Dev of Nirvani Akhada passed away due to corona during Kumbh Mela)

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. हरिद्वारमध्ये गेल्या 72 तासांमध्ये दीड हजारांहून अधिक केसेस समोर आल्या आहेत. कुंभ मेळ्यानंतर रुग्णसंख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा- मोठी बातमी, पुण्यात lockdown ठरला फायदेशीर, कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण घटले!

बुधवारी हजारो साधुंनी हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान केले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नव्हते. याशिवाय दुसऱ्या शाहीस्नानादरम्यान सांधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती. एका वृत्तपत्रातील बातमीनुसार कुंभमेळा सुरू असताना कुठेही मास्कची सक्ती केली नव्हती. त्याशिवाय रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केलं जात नव्हतं. याशिवाय कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला नव्हता.

First published:

Tags: Corona spread, Kumbh mela