BREAKING: राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा, पंतप्रधानांच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी

BREAKING: राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा, पंतप्रधानांच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई - एमएमआर जीरण, पुणे आणि काही बाधित भागासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे.

  • Share this:

विनया देशपांडे, मुंबई, 11 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने लॉकडाऊन उठवण्याची चिंता व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमवेत चिंता व्यक्त केली. यावर आवर घालण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वाढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा देशात वेगानं वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आज पुन्हा मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील स्थितीवरही प्रत्येक राज्य पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण लॉकडाऊन वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तयार असल्याचं सांगण्यात येत आहेत.

सावधान! निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना, डॉक्टरही झाले हैराण

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगमध्ये सीएम उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि डीजीही उपस्थित आहेत. यामध्ये मुंबई - एमएमआर जीरण, पुणे आणि काही बाधित भागासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे.

फोटो सेशनच्या नादात महिला तहसीलदाराकडूनच सोशल डिस्टंसिंगची 'ऐसी की तैसी'

ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत सकाळी 11 वाजल्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू आहे.

First published: April 11, 2020, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading