मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

गृहमंत्रीपदासाठी फडणवीस नाही, तर 'या' नेत्याचं नाव आघाडीवर, शिंदे-शहा भेटीची Inside Story

गृहमंत्रीपदासाठी फडणवीस नाही, तर 'या' नेत्याचं नाव आघाडीवर, शिंदे-शहा भेटीची Inside Story

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडेच होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडेच होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडेच होते.

नवी दिल्ली, 9 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यात आहेत. या दोघांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली.  रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा दोन वाजता संपली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्तारानं चर्चा झाली. राज्याचे नवे गृहमंत्रीपद कुणाला मिळणार यावर देखील या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस नाही तर चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद त्यांच्याकडेच होते. आता हे खातं फडणवीसांना न मिळता चंद्रकांत पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. गृह खात्यासह सहकार आणि अर्थ खात्यासाठी भाजपा आग्रही आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेत्याची नियुक्ती होऊ शकते. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा ओबीसी चेहरा पुढे करेल' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 'महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा दिल्लीचा विचार', 'सामना'मधून हल्लाबोल! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर टोलेबाजी या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती आणि किती खाती मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला 13 मंत्रिपद मिळू शकतात तर उर्वरीत मंत्रिपद भाजपाला मिळतील. शिंदे-फडणवीस  आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सोमवार उजाडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांसह बंड केलं. त्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीला आता आठवडा झाला असला तरी अजूनही मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप झालेलं नाही. याचबाबत अमित शाहांसोबत चर्चा झाली असल्याचं समोर आलं आहे.
First published:

Tags: Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या