मुंबई, 24 सप्टेंबर : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा आणि मॉल सुरू झाले आहे. पण, मंदिरं (maharashtra temple open) कधी उघडणार याकडे सर्वंचं लक्ष लागलं होतं. अखेर नवरात्रीच्या ( Navratri festival 2021) पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery ) यांनी केली आहे. ‘दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल’ असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. Shocking! फिट राहण्यासाठी घेतलं औषध; प्रसिद्ध खेळाडूचा जबडाच गळून पडला ‘धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत. केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.