सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी
मुंबई, 25 सप्टेंबर : राज्यातील शाळा अखेर सुरू (Maharashtra School reopen) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मात्र, मुंबईतील शाळा (Mumbai school) सुरू होणार की नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. यावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, सोमवार - मंगळवारपर्यंत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. ग्रामीण भागात पाचवी पासून वर्ग सुरू होत आहेत. पण शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू होत आहेत. मुंबई मनपाच्या शाळा आठवी ते दहावी पर्यंतच्या सुरू करणार आहोत.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण ड्राईव्ह
आता संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली आहे. गावावरून आलेले लोक कोरोना टेस्ट करण्यासाठी कमी येत आहेत. मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट 0.06 टक्के इतका आहे. मुंबईतील 15 टक्के बेड्स रुग्णांनी भरलेले आहेत. मुंबईतील जवळपास 70 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. शिक्षकांच्या लसीकरणावर भर देत आहोत. शिक्षकच नाही तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष ड्राईव्ह घेतला जाईल जेणेकरुन सर्व शिक्षक लसवंत होतील असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना
प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे -
शक्य असल्यास क्लिनिक सुरू करावे
विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे
शक्य असल्यास यासाठी इच्चूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी
सर्व शाळा आरोग्य केंद्रांशी संलग्न कराव्यात.
हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर आणि परिचारीकांची मदत घ्यावी.
उपरोक्त कामासाटी CSR किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा.
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू, पालकांवर मोठी जबाबदारी; शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली
शाळेत येताना घ्यावयाची काळजी
मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.
ज्या शाळांमध्ये स्कूल बस, खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी.
विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक / वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सूचना
जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात.
विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.
वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करुन घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kishori pedanekar, Mumbai, School