औरंगबाद, 11 ऑक्टोबर: औरंगाबाद शहरात (Aurangabad closed) महाराष्ट्र बंदला ( maharashtra band) चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व मुख्य बाजारपेठ बंद आहेत. ग्रामीण भागातही व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा दिला आहे. त्यात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सकाळी 9 वाजता रस्त्यावर उतरणार आहेत. व्यापारी आणि नागरिकांना बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र भाजपनंही व्यापाऱ्यांना आवाहन केलं आहे. दादागिरी करून बंद केला तर भाजप ला कळवा,असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा आजचा बंद म्हणजे सत्तेचा माज आहे. कोरोना काळातील बंदमुळे व्यापारी शेतकरी हैराण झाले असताना आज बंद ठेवणे हा अन्याय आहे. ज्या ठिकाणी बंद दादागिरी करून होईल त्या ठिकाणी भाजप रस्त्यावर उतरेल आणि भाजपकडून मुंहतोड जवाब देण्यात येईल अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली आहे. हेही वाचा- Video: बीडमध्ये शिवसेनेची गांधीगिरी; गुलाबाचं फुल देऊन केलं बंदचं आवाहन आज महाराष्ट्र बंद उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. आज 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं (Maharashtra Bandh 2021) आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. केंद्र सरकारला या बंदमधून सरकारला इशारा देण्यासाठी जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंद मध्ये सहभागी होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.