पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन, दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव झाकीर असे आहे. या झाकीरचे आणि दिल्ली पोलिसांनी अटक केल्या सहा दहशतवाद्यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसारच महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी झाकीरला ताब्यात घेतले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याने झाकीरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते अशी माहिती एटीएसने दिली आहे. Alert! लोकल ट्रेनमध्ये होणार Gas Attack?,गुप्तचर यंत्रणेचा इशारा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. ज्याचे नाव जान मोहम्मद (Jan Mohammad)असून त्याच्याबाबत एटीएसने मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत जान महोम्मद याच्या बाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असून त्याचे नाव जान मोहम्मद शेख आहे. मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे. जान मोहम्मद शेख याच्यावर कर्ज होते आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती पण त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने त्याने पुन्हा डी गॅंगला संपर्क केला अशी माहितीही एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.A joint team of Maharashtra ATS and Mumbai Police Crime Branch has taken a person into custody from Jogeshwari area of the city in connection with the terror module busted by Delhi Police earlier this week: Maharashtra ATS pic.twitter.com/ZYmIungyPl
— ANI (@ANI) September 18, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.