मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे निवडणूक पद्धत बदलीचा विषय आला"

"आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे निवडणूक पद्धत बदलीचा विषय आला"

Devendra Fadnavis reaction on Assembly Speaker Election process: विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या बदललेल्या पद्धतीवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 15 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) अद्यापही झालेली नाहीये. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आता घेण्यासाठी हालचालींना वेग आला असल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) दगाफटका बसू नये म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झाल्याचं बोललं जात आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रतिक्रिया देत मविआ सरकारला जोरदार टोला लगावला आहे. मविआ सरकारला आमदारांवर विश्वास नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभेचे कुठलेही नियम बदलायचे असतील तर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत समितीची बैठक झाली पाहिजे. उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक व्हॅलिड होत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे हात वर करून निवडणूक घेण्याचा विषय आलेला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सावध पवित्रा?, कायदे नियमांमध्ये बदल करण्यासाठी हालचाली नियम बदलाची जोरदार चर्चा राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड ही गुप्त पद्धतीने मतदान करुन घेण्यात येते. मात्र, ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी विधिमंडळ कायदे नियमांत बदल करण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीत पारित झाला असून तो सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपद हे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. अध्यक्षपदाची निवडणूक नागपूर अधिवेशनाच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेल्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
First published:

Tags: Devendra Fadnavis

पुढील बातम्या