दैनंदिन राशीभविष्य: सुट्टीच्या दिवशी फिरण्याचं प्लॅनिंग करताय? मग कसा असेल तुमचा दिवस? वाचा सविस्तर
दैनंदिन राशीभविष्य: सुट्टीच्या दिवशी फिरण्याचं प्लॅनिंग करताय? मग कसा असेल तुमचा दिवस? वाचा सविस्तर
आज आषाढ शुक्ल चतुर्थी. आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल.आज बुधाच्या राशी परिवर्तन असून मिथुन ह्या आपल्या उच्च राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य.
आज दिनांक ३ जुलै २०२२ वार रविवार. आज आषाढ शुक्ल चतुर्थी. आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल.आज बुधाच्या राशी परिवर्तन असून मिथुन ह्या आपल्या उच्च राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य.
मेष
आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. प्रवास योग येतील मानसिक प्रसन्नता जाणवेल.कार्यालयीन कामकाज सुरळीत राहील.लाभ होतील. दिवस मध्यम.
वृषभ
आयुष्यात नवीन शुभ घटनांची सुरवात होईल. रवि बुध आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देतील. चंद्र काही नवीन जबाबदारी निर्माण करेल .शांत रहा. दिवस शुभ.
मिथुन
चंद्र मानसिक ताण निर्माण करेल . आज कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका. परदेश बाबत शुभ फल मिळेल . दिवस शांततेत घालवा.
कर्क
आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात.प्रकृतीची काळजी घ्या. व्यय स्थानात रवि बुध कायद्या पासून जपा असे संकेत देत आहे. दिवस शुभ आहे.
सिंह
राशी स्वामी रवि सध्या सकारात्मक मानसिकता देईल . शरीरात ऊर्जा वाटेल. चंद्र कार्य क्षेत्रात विशेष वर्तमान आणेल. आज दिवस मध्यम जाईल.
कन्या
व्यय चंद्र असून आज घरा विषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल .दिवस चांगला.
तुला
घरात अशांतता निर्माण होईल असे वागू नका. कलह टाळा. जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील . आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा.
वृश्चिक
अतिशय धावपळीचा असा हा दिवस असणार आहे. खूप महत्वाचे निर्णय , फोनवर संवाद होतील. पण प्रवास टाळा. नुकसान होईल. दिवस बरा आहे.
धनु
आर्थिक बाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे.काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. कुटुंबात काही अडचणी येतील. दिवस मध्यम.
मकर
वक्री शनि , अष्टम चंद्र आहे, दिवस जरा कठीण जाईल. मन काहीसे उदास राहील. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा..दिवस संथ आहे.
कुंभ
राशी स्थानात झालेली शनि ग्रहाची वक्री स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. सप्तम चंद्र आहे. द्वितीय गुरू परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल.दिवस मध्यम आहे.
मीन
आज दिवस नातेवाईकांना भेट ,संपर्क करण्याचा आहे.काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा .कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. प्रवास टाळा.दिवस शुभ.
शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.