मुंबई, 06 जुलै: आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना सभागृहात कामकाज पाहिले आहे. कधी आम्ही सत्तेत होते तर कधी विरोधी बाकावर होतो. सभागृहात मतभेद होत असतात. पण सभागृहात काल जे घडले ते अत्यंत अशोभनिय वर्तन भाजपचे होते', अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
पावसाळी अधिवेशनाचे (Maharashtra Assembly Session) सूप अखेर वाजले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपवर सडकून टीका केली.
'भास्कर जाधव हे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे. त्यांनी सभागृहात अनेक वर्ष काम पाहिले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनीही त्यांच्यासोबत काम केले आहे. आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना सभागृहात कामकाज पाहिले आहे. कधी आम्ही सत्तेत होते तर कधी विरोधी बाकावर होतो. सभागृहात मतभेद होत असतात. फडणवीसांच्या काळात आमचे 19 आमदार निलंबित केले होते. आम्ही विनंती केली तरी ती मान्य केली नाही. शेवटी आम्हाला हल्लाबोल आंदोलन करावे लागले होते' अशी आठवण अजितदादांनी भाजपला करून दिली.
'सोमवारी अधिवेशनात अत्यंत अशोभोनिय गोष्ट होती. म्हणजे, भास्कर जाधवांना इतके वर्ष काम पाहतोय, पण भाजपच्या नेत्यांचा तोल गेला. त्याच्यातील वरिष्ठ नेत्यांचा सुद्धा त्यांच्यावर नियंत्रण राहिले नाही. ते भास्कर जाधव यांच्यासमोर गेले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात सुद्धा त्यांनी गोंधळ घातला. त्याबद्दल भास्कर जाधव यांनी सगळं सांगितलं आहे. त्यांच्या अंगावर भाजपचे लोकं धावून गेले. उलट भास्कर जाधव यांनी मोठेपणा दाखवला. सभागृहात फडणवीस यांनी मान्य केलं की काय घडलं' असंही अजितदादा म्हणाले.
'आशिष शेलार आणि इतर लोकांच्या लक्षात आलं की आपण किती गोंधळ घातला. दालनात जो काही प्रकार घडला तो शरमेचा होता. आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो तेव्हा दालनात आंदोलन केले पण असा वाद कधी घातला नाही. याआधी सुद्धा आमदारांनी गोंधळ घातला होता. यात कारवाई करण्यात आली. कालचा गोंधळ कमी होता की काय आज प्रतिविधानसभा भरवण्यात आली. त्यामुळे कालच्या गोंधळानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं' अशी टीका अजितदादांनी केली.
'आज सुद्धा रवी राणा सभागृहात धावत आले आणि राजदंड पळवून नेलं. उलट भास्कर जाधव यांनी मोठ्या मनाची भूमिका घेत राणा यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना बोलून देण्यासाठी जाधव यांनी सांगितलं होतं. पण, शेतकऱ्यांच्या विषयावर काही बोलायचं नाही, असा त्यांचा पवित्रा होता, तो त्यांनी दाखवून दिला' असंही अजितदादा म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly session, Maharashtra, Monsoon, Mumbai, Session