मुंबई, 6 जुलै : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची (Monsoon Session) सांगता झाली आहे. दोन दिवसीय या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. याच दरम्यान भाजपच्या 12 आमदारांचे निलंबनही (opposition 12 mla suspended) करण्यात आलं. तर दुसऱ्या दिवशी भाजपने आमदारांच्या निलंबनाचा निषेध करत विधानभवन परिसरात निषेध व्यक्त केला. दोन दिवसीय अधिवेशनाचे कामकाज पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
विरोधकांना जोरदार टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाहीये. मुद्दा काय होता. केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागण्याचा होता. यामध्ये नवीन आम्ही काय केलं. जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची मागणी सुद्धा केली होती. राज्यपालांना सुद्धा आम्ही ही विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर यात चुकीचं काय आणि एवढ्या मिरच्या जोंबण्याचं कारण काय? ओबीसी समाजाच्या बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता.
देवेंद्र फडणवीसांना टोला
अधिवेशनात सोमवारी झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत म्हटलं, कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळिमा फासणार आहे. उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
भाजपने अधिवेशनात जे केलं ते अशोभनिय, अजितदादांचा घणाघातमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळिमा
उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत? देवेंद्र फडणवीस यांना टोला
कालचा गोंधळ शरमेने मान खालींघालायला लावणारा
अधिवेशनात असं घडणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही
विरोधकांनी सभागृहात बाजू मांडायला हवी होती
ही आरोग्यदायी लोकशाहीच लक्षण नाही
ने घडलं ते समोर आलं नाही, जर आलं तर राजकारणाची शिसारी येईल
प्रत्येकाने मर्यादा पाळाव्या यावर चिंतन व्हावं
अधिवेशनातील वागणुकीचा दर्जा खालावत चालला आहे
सत्ता एक सत्ता हा अट्टाहास असणे म्हणजे पुढचे दिवस वाईट मुख्यमंत्री
बोगस लसीकरण हा जीवघेणा प्रकार
बोगस व्हॅक्सीन प्रकरणात जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणार
सगळी खबरदारी घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ
मी दोघांच्या ( अजित पवार, बाळासाहेब थोरात) मध्ये आहे, मला बाहेर निघायचं असेल तर या दोघांना टाळण शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार टिकेल का या प्रश्नाला उत्तर दिलं
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
गेल्या अनेक वर्षे सभागृहात काम करत आहे
या सभागृहात पवित्र राखलं गेल पाहिजे
काल झालेली घटना अशोभनीय
विरोधी पक्षाच्या तोल गेला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.