जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Maghi Ganpati 2023: तुमच्या नावाचा बाप्पा साकारणारा अक्षरांचा जादूगार, Video

Maghi Ganpati 2023: तुमच्या नावाचा बाप्पा साकारणारा अक्षरांचा जादूगार, Video

Maghi Ganpati 2023: तुमच्या नावाचा बाप्पा साकारणारा अक्षरांचा जादूगार, Video

Akshar Ganesh : मुंबईतील अभिषेक चिटणीस हा कलाकार फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही सांगितलेल्या कोणत्याही नावाचा गणपती साकार करतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 20 जानेवारी :  प्रत्येक शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या शुभ आशिर्वादाने व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुमच्या नावातच श्री गणेशाचं नाव साकारलं तर…नवल वाटेल ना?  मुंबईतील अभिषेक चिटणीस हा कलाकार फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही सांगितलेल्या कोणत्याही नावाचा गणपती साकार करतो. त्यानं आत्तापर्यंत 20 ते 25 हजार अक्षर गणेश साकारले आहेत. मुंबईसह राज्यात माघी गणेशोत्सवाला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. सर्व चौशष्ट कला गुणांचा तो अधिपती असल्याने त्याला गुणपती असेही एक नाव आहे. बाप्पांना आपण विविध नावारूपाने संबोधतो. काळाबरोबर अपडेट झालेले गणपतीबाप्पा ‘अक्षर गणेश’ या कला प्रकारातून भक्तांना आकर्षित करत आहेत. मुंबईतल्या परळ भागात राहाणारा अभिषेक अक्षरांच्या माध्यमातून गणपती बाप्पा साकारतो. तो गेल्या 10 वर्षांपासून अक्षर गणेश साकारत आहे. राजकीय नेत्यांपासून हिंदी, मराठी अभिनय क्षेत्रातील कलाकारांना देखील अभिषेकने साकारलेल्या कलाकृतीची भूरळ पडलीय. Maghi Ganpati 2023 : तुमच्या बाप्पाच्या सजावटीसाठी बाजारात काय आहे नवं? पाहा Video क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, राजकीय नेत्यांमध्ये राज ठाकरे, अजित पवार यांनी देखील अभिषेकच्या कलेचे कौतुक केले आहे. गायिका आशा भोसले, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता रितेश देशमुख, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा, धर्मेश  यांना प्रत्यक्ष भेटून त्याने अक्षर गणेश कलाकृती दिली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ही कला साकारताना अनेक अडचणींवर मात करत आपल्या घरच्यांच्या पाठबळामुळे अभिषेक जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कला पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना ही कला मोफत प्रशिक्षण देणार असल्याचं ही त्यानं सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात