Home /News /maharashtra /

कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..

कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..

किल्ल्याच्या शिखरावर असलेल्या मंदिराजवळ अचानक गेला तोल

धुळे, 20 नोव्हेंबर: शहरापासून जवळच असलेल्या लळींग किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली. कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेल्या एका महिलेचा पाय घसरून खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. ललिता प्रफुल्ल चव्हाण (वय-38) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा...3 सख्ख्या भावंडावर काळाचा घाला, टाकीवर चढून नातेवाईकांच शोले स्टाईल आंदोलन शहरातील गोपाळ नगरात राहणाऱ्या ललिता चव्हाण या महिलेचा लळींग किल्ल्याच्या शिखर भागावरून तोल गेल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजेदरम्यान घडली. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले प्रफुल्ल चव्हाण हे पत्नी, मुलगा यांच्यासोबत सकाळी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी किल्ल्याच्या शिखरावर असलेल्या मंदिराजवळ अचानकपणे तोल गेल्याने जवळपास 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. किल्ल्यावर काम करणाऱ्या लोकांना घटना लक्षात येताच त्यांनी गावाचे पोलीस पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने सदर महिलेच्या मृतदेहाची शोधाशोध करून तब्बल तीन तासात अथक परिश्रमाने महिलेचा मृतदेह किल्ल्याच्या पाठीमागच्या भागात खाली उतरवण्यात आला. हिवाळ्याचे दिवस असल्याने फिरण्यासाठी अनेकजण सकाळी कुटुंबासह किल्ल्यावर येतात. चव्हाण हे देखील त्यापैकीच एक होते. ते सुद्धा आपली पत्नी आणि 12 वर्षीय मुलासोबत फिरण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला जाईल याची जरा देखील त्यांनी कल्पना केली नसेल. घटनेची माहिती मिळताच प्रफुल्ल चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत पाहिल्याने निकटवर्तीयांना अश्रू अनावर झाले. हेही वाचा..धक्कादायक! BMW वर लघुशंका करण्यापासून रोखलं म्हणून गार्डला पेट्रोल टाकून पेटवलं किल्ल्याच्या पाठीमागचा भाग अत्यंत घसरडा व निमुळता असल्याने महिलेचा मृतदेह काढणे खूप कठीण जात होते. मात्र लळींग गावातील स्थानिकांसह, इरकॉन टोल कंपनीचे कर्मचारी, मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वनविभागाचे वनमजुर आदींच्या मदतीने अखेर मृतदेह किल्ल्याच्या मागील भागात खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मोहाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या