मुंबई, 21 मार्च : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. (Mumbai Coronavirus update) दिवसेंदिवस ही संख्या आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारला लॉकडाऊन (Lockdown Again?) हा एकमेव मार्ग राहतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
काल राज्यातील रुग्णसंख्येने सर्व रेकॉर्ड तोडून आकडा 27 हजारांच्या पार केला होता. त्यातच मुंबईतील रुग्णसंख्येनेही आतापर्यंतचं सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पालिकेच्या कोविड अपडेटनुसार गेल्या 24 तासात मुंबईत 3775 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. अद्याप राज्याची कोरोना अपडेट आलेली नाही. मात्र पालिकेने दिलेल्या अपडेटनुसार ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
हे ही वाचा-महाराष्ट्रात कोरोनाने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड, 24 तासांत सर्वाधिक रुग्ण
राज्यात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. काल राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 27 हजारांचा टप्पा पार केला आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. राज्यातील पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर (Coronavirus Second Wave in Maharashtra) थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणं (Second in Maharashtra) आहे. महाराष्ट्राची परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा महाराष्ट्रात कोरोनाचे तितकेच रुग्ण येत आहे. कोरोनाची दुसरी वाट येत्या काळात काय काय करू शकते, याबाबत महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 90 टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची ही प्रकरणं फार गंभीर नाहीत पण कोरोनाव्हायरस आता युरोपप्रमामे वेगाने पसरतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.