मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

गोड बोलून घरी नेलं अन्..; कोल्हापुरात जावयानं सासऱ्याचा खून करून दगडाखाली गाडलं

गोड बोलून घरी नेलं अन्..; कोल्हापुरात जावयानं सासऱ्याचा खून करून दगडाखाली गाडलं

Murder in Kolhapur:  कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळे याठिकाणी एका तरुणानं आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या (Father in law brutal murdered by son in law) केली आहे.

Murder in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळे याठिकाणी एका तरुणानं आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या (Father in law brutal murdered by son in law) केली आहे.

Murder in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळे याठिकाणी एका तरुणानं आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या (Father in law brutal murdered by son in law) केली आहे.

  • Published by:  News18 Desk
मलकापूर, 05 डिसेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या शाहूवाडी (Shahuwadi) तालुक्यातील निनाई परळे याठिकाणी एका तरुणानं आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या (Father in law brutal murdered by son in law) केली आहे. आरोपी जावयाने सासऱ्याची हत्या करून त्यांचा मृतदेह ओढ्यातील दगडाखाली पुरून (buried him under rock) ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं सासऱ्याची हत्या केल्यानंतर, घटनेची वाच्यता न करण्याची धमकी कुटुंबीयांना दिली होती. मात्र गावातील अन्य लोकांमुळे ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. राजू निकम असं हत्या झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. तर लहू निकम असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी जावयाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावात सिंधुदुर्ग येथील आदिवासी समाजातील काही नागरिक उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात किंवा माळरानावर झोपडी बांधून राहतात. आरोपी लहू हा देखील शाहूवाडी येथील एका गावात झोपडी बांधून राहत होता. तसेच एका जनावराच्या गोठ्यात तो कामाला होता. हेही वाचा-मुलींना कपडे घेण्यासाठीही नव्हते पैसे; हताश पित्याने उचललं धक्कादायक पाऊल दरम्यान काही दिवसांपूर्वी लहू याने आपल्या मालकाच्या घरी चोरी केली होती. या चोरीबाबतची माहिती सासरे राजू यांनीच मालकाला सांगितली असावी, असा संशय आरोपी लहूला होता. त्यामुळे त्याने आपले सासू सासरे यांना गोड बोलून दोघांनाही निनाई परळे येथील आपल्या झोपडीत घेऊन आला होता. यानंतर घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री सासरा-जावई यांनी एकत्र बसून मद्यपान केलं. पण दारू प्यायल्यानंतर जावई लहू याने आपल्या सासऱ्यासोबतचा वाद उकरून काढला आणि त्यांना बेदम मारहाण केली. हेही वाचा-5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्या पित्यानं केले 7 तुकडे ही मारहाण इतकी भयंकर होती, की यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी जावयाने कडवी प्रकल्पाशेजारील एका ओढ्यातील दगडाखाली सासख्याचा मृतदेह पुरला. तसेच पोलिसांना घटनेबाबत काहीही सांगितलं तर याद राखा, अशी धमकी आरोपीनं आपल्या घरच्यांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या घरच्यांनी याबाबत कोणालाही काहीही सांगितलं नाही. पण निनाई परळे गावातील काही जणांनी फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ओढ्यात शोध घेतला असता, त्यांना मृतदेह आढळला आहे. या घटनेचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Kolhapur, Murder

पुढील बातम्या