मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: धाडस दाखवत वडिलांनी बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याची केली सुटका, मुंबईतील थरारक घटना

VIDEO: धाडस दाखवत वडिलांनी बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याची केली सुटका, मुंबईतील थरारक घटना

बिबट्याने हल्ला केलेल्या 8 वर्षीय चिमुकल्याचं नाव रोहित आहे.

बिबट्याने हल्ला केलेल्या 8 वर्षीय चिमुकल्याचं नाव रोहित आहे.

आरे कॉलनीत राहणाऱ्या एका 8 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला (Leopard attack on minor boy) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 सप्टेंबर: मुंबईतील गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीत मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यांपासून बिबट्या अनेकदा शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत शिरला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. सायंकाळनंतर नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. अशात आरे कॉलनीत राहणाऱ्या एका 8 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला (Leopard attack on minor boy) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

संबंधित घटना आरे कॉलनीतील यूनिट नंबर 31मध्ये घडली आहे. याठिकाणी 18 सप्टेंबर रोजी रोहित नावाचा एक 8 वर्षांचा मुलगा दुकानाला जाऊन परत येत होता. दरम्यान बिबट्याने संबंधित मुलावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रोहित मोठ्यानं ओरडू लागला. दरम्यान रोहितचा आवाज ऐकून त्याच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याट्या चेहऱ्यावर टॉर्च लावून बिबट्याला पळवून लावलं आहे.

हेही वाचा-हॉटेलमध्येच 3 महिलांकडून तरुणीला जबर मारहाण; संतापजनक घटनेचा VIDEO आला समोर

या थरारक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. टॉर्चच्या उजेडामुळे बिबट्या घाबरून पळून गेला आहे. या हल्ल्यात बिबट्यानं 8 वर्षीय चिमुकल्याचा पाय आपल्या जबड्यात पकडला होता. यामध्ये रोहितच्या पायाला तीन ठिकाणी दुखापत झाली आहे. सुदैवाने त्याठिकाणी त्याचे वडील होते, त्यामुळे बालकाचा प्राण वाचला आहे.

हेही वाचा-VIDEO: चिमुकली पाण्यात बुडत असल्याचं दिसताच मदतीला धावला कुत्रा; असा वाचवला जीव

विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यांपासून बिबट्याचा आरे कॉलनीतील वावर वाढला आहे. दरम्यान एका मांजरीची शिकार करण्यातानाचा बिबट्याचा व्हिडीओ समोर आला होता. याशिवाय एका महिलेवर आणि काही कुत्र्यांवर देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता संजय गांधी नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांकडून आरे जंगलात काही ठिकाणी पिंजरा लावण्याचं काम सुरू आहे.

First published:

Tags: Leopard, Mumbai