मराठी बातम्या /बातम्या /मनी /

30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकाला मिळतील 5 लाख रुपये! तुमचं या बँकेत अकाऊंट आहे का?

30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकाला मिळतील 5 लाख रुपये! तुमचं या बँकेत अकाऊंट आहे का?

2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला.

2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला.

मध्यंतरी देशातील कित्येक बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे, आरबीआयने (RBI) बऱ्याच को-ऑपरेटिव्ह बँकांवर निर्बंध लागू केले होते. या बँकांची लवकरच सेटलमेंट होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.

मुंबई, 19 सप्टेंबर : मध्यंतरी देशातील कित्येक बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे, आरबीआयने (RBI) बऱ्याच को-ऑपरेटिव्ह बँकांवर निर्बंध लागू केले होते. या बँकांची लवकरच सेटलमेंट होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. अर्थ मंत्रालयाने 27 ऑगस्ट 2021ला एक सर्क्युलर (RBI moratorium scheme) जारी केले होते. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार देशातील अशा कित्येक बँका सध्या रिझर्व्ह बँकेच्या मॉरेटोरियममध्ये आहेत. यासोबतच, सरकारने ठरवल्याप्रमाणे 1 सप्टेंबर 2021 पासून पुढे 90 दिवसांच्या आत या बँकांच्या खातेदारांना मॉरेटोरियमअंतर्गत म्हणून 5 लाख (bank holders to get 5 lakh) रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, 30 नोव्हेंबरच्या आत या बँकांमधील खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळू शकतात.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2021 पासून इन्शुरन्स ऍण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (अमेंडमेंट) ॲक्ट, 2021 लागू केला आहे. यानुसार, ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेने मॉरेटोरियमला ठेवले आहे, त्या बँकांमधील सर्व खातेदारांना 5 लाख (Bank account holders to get 5 lakh) रुपये मिळतील. यासोबतच, ज्या बँका डिपॉझिट गॅरंटी कायदा (Deposit guarantee act) लागू होण्यापूर्वीच मॉरेटोरियममध्ये (RBI moratorium) गेल्या होत्या, त्या बँकांमधील खातेदारांनाही हे पैसे मिळणार आहेत.

इंडस लॉ ‘इकॉनॉमिक टाईम्स’चे पार्टनर निशांत सिंह यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “रिझर्व्ह बँक सध्या बुडालेल्या बँकांच्या रिस्ट्रक्चरिंग स्कीमवर (Restructuring of stressed banks) काम करत आहे. त्यामुळे, ते ग्राहकांना 5 लाख रुपये देण्याचा कालावधी आणखी 90 दिवस वाढवण्याचे निर्देशही डीआयसीजीसीला देऊ शकतात. असं झाल्यास, खातेदारांना त्यांच्या बँकेत ठेवलेल्या एकूण पैशांपैकी 5 लाख रुपये मिळण्यासाठी आणखी वाट पहावी लागू शकते. जर बुडालेल्या बँकेला मोठ्या बँकेमध्ये मर्ज करण्याचा निर्णय घेतला, तर नक्कीच हा कालावधी वाढू शकतो. मात्र, त्यामुळे ग्राहकांना आपले पैसे मिळणे अधिक सुलभ होईल.”

कोणत्या बँकांचा समावेश

सध्या मॉरेटोरियममध्ये (List of banks in RBI moratorium) असलेल्या बँकांमध्ये मध्य प्रदेशमधील ग्रह को-ऑपरेटिव्ह बँक, विजयवाड्यातील डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि नाशिकमधील इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश आहे. यासाठी असलेल्या 90 दिवसांच्या कालावधीला आरबीआयने दोन भागांमध्ये विभागलं आहे. पहिल्या 45 दिवसांमध्ये बुडालेल्या बँका आपल्या खातेदारांचे रेकॉर्ड गोळा करतील, आणि ती माहिती DICGCकडे देतील. पुढच्या 45 दिवसांमध्ये DICGC या सर्व कागदपत्रांची तपासणी करून, ग्राहकांना 5 लाख रुपये परत करेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं, की बुडालेल्या बँकांमधील पैसे परत मिळवण्यासाठी आधीप्रमाणे 8 ते 10 वर्षं वाट पाहण्याची गरज नाही. याच पार्श्वभूमीवर हे काम सुरू आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फायदा PMC बँकेला मिळणार आहे. यासोबतच, वर उल्लेख केलेल्या बँकांव्यतिरिक्त जवळपास 50 बँका आरबीआयच्या मॉरेटोरियममध्ये आल्या आहेत.

First published:

Tags: Rbi, बँक