मुंबई, 10 सप्टेंबर: आज गणेश चतुर्थी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सर्वांचं लक्ष लागलं होतं ते लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे. अखेर ते दर्शन झालं आहे. लालबागचा राजाची पहिली झलक समोर आली आहे.
कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांमुळे यंदा लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीची उंची कमी करण्यात आली आहे. मात्र राजाचा दरबार मात्र नेहमी प्रमाणेच भव्य दिव्य असणार आहे. लालबागच्या राजाची यंदाची मूर्ती कशा स्वरूपात असणार या बद्दल सर्वच गणेशभक्तांमध्ये मोठी उत्सुकता होती.
सकाळी लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना पूजा पार पडली. त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन गणेशभक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
मंडळाचे हे यंदाचं 88 वं वर्ष आहे. यंदा मंडळानं 4 फुटांची राजाचा प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं गणेशोत्सव रद्द करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
मंडलानं यंदा राज्य सरकारच्या गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी ही माहिती दिली. तसचं कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा तयार करण्यात आला आहे.
मुंबईची शान 'लालबागचा राजा' ऑनलाईन दर्शन, प्रसादासाठी करा बुकींग
लालबागचा राजाचा प्रसाद घरपोच
लालबागचा राजाचा प्रसाद तुम्हाला घरपोच मिळावा यासाठी मंडळाकडून (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshshotsav Mandal) सोय करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यामध्ये बाप्पाचा प्रसाद मोफत घरपोच दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग स्वीकरली जाणार आहे. जिओ मार्टच्या माध्यमातून हा प्रसाद पोहचवला जाणार असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. या प्रसादामध्ये 2 लाडू दिले असणार आहेत . प्रसाद वितरणाची माहिती मंडळाच्या अधिकृत वेबसाईट http://lalbaugcharaja.com वर उपलब्ध आहे. तसंच वेबसाईटवर QR कोड स्कॅन करून देखील नागरिकांना आपली ऑर्डर बूक करता येणार आहे.
महाराष्ट्राचा महाउत्सव
महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सवाला आजपासून झाली आहे. पुढील दहा दिवस महाराष्ट्राच्या सर्वोच्च संस्कृती आणि परंपरेचं दर्शन अवघ्या जगाला होणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोविड 19 संसर्गाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी गणेशोत्सवात निर्बंध घालत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.
श्रीमंत दगडूशेठ गणपती अवतरणार आपल्या घरी, कसा? त्यासाठी करा येथे Click
गणेशोत्सव म्हणजे भक्तांची अफाट गर्दी त्यामुळे कोविड 19 संसर्गाच्या प्रादुर्भावाला आयतेच निमंत्रण मिळणार त्यामुळे आरोग्य सुरक्षेची खबरदारी आणि उपाययोजना करतच यंदाचा उत्सव साजरा करावा लागणार आहे. जगावर आलेलं कोविड १९ संसर्गाचं विघ्नं... विघ्नंहर्ता दूर करोत हिच त्याच्याकडे प्रार्थना.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganesh chaturthi