मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून मुंबईची शान 'लालबागचा राजा'चं ऑनलाईन दर्शन

Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून मुंबईची शान 'लालबागचा राजा'चं ऑनलाईन दर्शन

Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) विराजमान होणार आहे.

Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) विराजमान होणार आहे.

Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) विराजमान होणार आहे.

मुंबई, 10 सप्टेंबर: Ganesh utsav 2021: आज गणेश चतुर्थी. (Ganesh chaturthi) गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात आज घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.

यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) विराजमान होणार आहे. लालबागच्या राजाच्या जगभरातील करोडो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोविड 19च्या (Corona Virus) संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने "आरोग्य उत्सव" साजरा करून आदर्श निर्माण केला होता. मात्र यावेळीही भाविकांना मंडपात जाऊन दर्शन घेण्याची सोय नसणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी देखील ऑनलाईन (Online) दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

शुक्रवारी राजाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन दर्शन सुरु केलं जाणार आहे. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवरुन आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेता येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

गणेशोत्सवाआधीच धोक्याची घंटा! राज्यातील Active cases पुन्हा 50000 पार; बरी होणारी रुग्णसंख्याही घटली

मंडळाचे हे यंदाचं 88 वं वर्ष आहे. यंदा मंडळानं 4 फुटांची राजाचा प्रतिपृतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं गणेशोत्सव रद्द करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

मंडलानं यंदा राज्य सरकारच्या गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी ही माहिती दिली. तसचं कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा तयार करण्यात आला आहे.

लालबागचा राजाचा प्रसाद घरपोच

लालबागचा राजाचा प्रसाद तुम्हाला घरपोच मिळावा यासाठी मंडळाकडून (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshshotsav Mandal) सोय करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यामध्ये बाप्पाचा प्रसाद मोफत घरपोच दिला जाणार आहे.

यासाठी ऑनलाईन बुकिंग स्वीकरली जाणार आहे. जिओ मार्टच्या माध्यमातून हा प्रसाद पोहचवला जाणार असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. या प्रसादामध्ये 2 लाडू दिले असणार आहेत . प्रसाद वितरणाची माहिती मंडळाच्या अधिकृत वेबसाईट http://lalbaugcharaja.com वर उपलब्ध आहे. तसंच वेबसाईटवर QR कोड स्कॅन करून देखील नागरिकांना आपली ऑर्डर बूक करता येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Ganesh chaturthi