पुणे, 10 सप्टेंबर: Ganesh Chaturthi 2021: श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth ganpati) सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि मिलिंद राहुरकर हे पौरोहित्य करणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, ‘श्रीं’चे दर्शन आणि ऋषिपंचमीनिमित्त होणारा अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने घेतला जाणार आहे .भाविकांना दर्शन ऑनलाइन घेता येईल आकर्षक अशी सजावट मंदिरा बाहेर करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचीही स्थापना मुख्य मंदिरातच होणार आहे. मात्र असं असतानाही श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं आपल्या घरी अवतरणार करता येणार आहे. अभिनेते प्रशांत दामले यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये त्यांचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती आपल्या घरी कसा अवतरणार हे समजावून सांगितलं आहे.
तुम्हीही श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची घरी आरती कशी करू शकणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ गणपती अवतरणार आपल्या घरी. • सोबत दिलेला व्हिडिओ पहा. • त्यामध्ये श्री. प्रशांत दामलेंनी दिलेल्या सुचना समजून घ्या. • नंतर सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा. • मंदिरातील श्रीमंत दगडूशेठ गणपती जसेच्या तसे आपल्या घरी अवतरतील. https://t.co/JZg5mtUkna pic.twitter.com/aEdUO9QaEK
— Dagdusheth Ganpati (@DagdushethG) September 9, 2021
या व्हिडिओत प्रशांत दामले यांनी दिलेल्या सूचना समजून घ्या. नंतर सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा. मंदिरातील श्रीमंत दगडूशेठ गणपती जसेच्या तसे आपल्या घरी अवतरतील. मग सहकुटुंब बाप्पांची आरती करा. आपला व्हिडिओ, व्हॉटस्ॲपवर आणि सोशल मीडियावर अपलोड करा.
मुंबईची शान 'लालबागचा राजा' ऑनलाईन दर्शन, प्रसादासाठी करा बुकींग
अशी करा प्रोसेस
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला आता प्रत्यक्ष आपल्याला घरात आणायचं असेल तर त्यासाठी www.DagdushethGanpati.net ही लिंक क्लिक करा. ही लिंक ओपन झाल्यानंतर प्ले आरती लिहिलं आहे. मग आरती सुरू झाली आहे. त्यानंतर उजवीकडे एक बटण आहे तिथे क्लिक करा मग कॅमेरा सुरू होईल आणि मग दगडूशेठ गणपती प्रत्यक्ष तुमच्या घरात अवतरलेला दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.