मुंबई, 09 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून (mumbai drug case) राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केलेल्या आरोपांमुळे एनसीबी आणि समीर वानखेडे (sameer wankhede) यांची मोठी कोंडी झाली. आज वानखेडे कुटुंबीयांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनीही त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला.
एनसीबीचे मुंबईत विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना ज्ञानदेव वानखेडे म्हणाले की, 'आम्ही राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. आमच्यावर अन्याय होत आहे. अनेक आरोपांना आम्हाला सामोरं जावं लागलं आहे. काहीतरी कारवाई ते निश्चित करतील अशी अपेक्षा आहे'
We told the Gov everything - everything happening with us. It was not as if we went to him with a complaint. We just told him that it's a fight for truth & we're going to fight, we just need strength. He gave us strength & assurance: Kranti Redkar Wankhede, Sameer Wankhede's wife pic.twitter.com/FPnfvTUdOj
— ANI (@ANI) November 9, 2021
तर, आमच्यावर अन्याय होत आहे. ही सत्याची लढाई आहे. आम्ही सत्याचे योद्धे आहोत. राज्यपालांसमोर आम्ही आमची परिस्थिती मांडली. आमच्या कुटुंबावर होणाऱ्या चिखलफेकीची माहिती दिली. नवाब मलिक करत असलेल्या बेताल आरोपांबद्दल सांगितलं. आमच्यावर जे काही आरोप झाले त्यामुळे आम्ही रडण्यासाठी राज्यपालांकडे नाही गेलो, राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, आमचं मनोबल वाढलं असून राज्यपालांनी आम्हाला धैर्य राखण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती क्रांती रेडकर यांनी दिली.
Corona Vaccine घेतल्यानंतर फळफळलं महिलेचं नशिब, काहीच क्षणात बनली करोडपती!
काही दिवसांपूर्वी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली होती. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची भेट घेतली होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या प्रकरणांमध्ये नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकर हिच्या संदर्भातला एक खुलासा केला होता. तुमची मेहुणीही ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात ड्रग्जचा खटला सुरू आहे, असा आरोप मलिक यांनी केला होता. पुणे पोलिसांनी 2008 मध्ये हर्षदा रेडकरविरोधात अंमली पदार्थांच्या विरोधातला गुन्हा दाखल आहे असं म्हटलं आहे. मात्र प्रत्यक्षात हा गुन्हा बेकायदा देहविक्रीसाठी दाखल झाला असल्याची नोंद पुणे पोलिसांच्या अभिलेखावर आहे.
समीर वानखेडेंचं उत्तर
नवाब मलिकांच्या सवालावर उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, जानेवारी 2008 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा मी सेवेतही नव्हतो. मी 2017 मध्ये क्रांती रेडकरशी लग्न केलं. मग तरीही मी या केसशी कसा जोडला जातो?, असा सवालही समीर वानखेडे यांनी उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.