Home /News /mumbai /

महाराष्ट्रात Tesla Plant च्या उभारणीसाठी जयंत पाटलांचं Elon Musk यांना आमंत्रण

महाराष्ट्रात Tesla Plant च्या उभारणीसाठी जयंत पाटलांचं Elon Musk यांना आमंत्रण

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांना महाराष्ट्रात येण्यासाठी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे.

मुंबई, 16 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांना महाराष्ट्रात येण्यासाठी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे वाचा - मंगळ मिशनवर एलन मस्कचं मोठं वक्तव्य! आगामी प्रकल्प पाहून तुम्हीही व्हाल अवाक

इलेक्ट्रिक टेस्ला कारचं अनेकांना आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ट्विटरवरील एका युजरने याबाबतचा प्रश्न एलन मस्क यांना विचारला. त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचं मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, तुमच्या उभारणीसाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य करायला मिळेल. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलन मस्क यांना महाराष्ट्रात आमंत्रित केले आहे. परंतु एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना एलन मस्क यांनी अजूनही सरकारी अडचणींचा सामना करत असल्याचं म्हटलं आहे.
Published by:Karishma
First published:

Tags: Elon musk, Maharashtra, Tesla, Tesla electric car

पुढील बातम्या