मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मंगळ मिशनवर एलन मस्कचं मोठं वक्तव्य! आगामी प्रकल्प पाहून तुम्हीही व्हाल अवाक

मंगळ मिशनवर एलन मस्कचं मोठं वक्तव्य! आगामी प्रकल्प पाहून तुम्हीही व्हाल अवाक

स्पेसएक्सच्या मिशन मंगळ अंतर्गत येत्या पाच वर्षांत जर माणूस मंगळ ग्रहावर पोहोचला नाही तर मला नवल वाटेल, असं वक्तव्य अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांनी व्यक्त केलं आहे.

स्पेसएक्सच्या मिशन मंगळ अंतर्गत येत्या पाच वर्षांत जर माणूस मंगळ ग्रहावर पोहोचला नाही तर मला नवल वाटेल, असं वक्तव्य अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांनी व्यक्त केलं आहे.

स्पेसएक्सच्या मिशन मंगळ अंतर्गत येत्या पाच वर्षांत जर माणूस मंगळ ग्रहावर पोहोचला नाही तर मला नवल वाटेल, असं वक्तव्य अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांनी व्यक्त केलं आहे.

न्यूयॉर्क, 15 जानेवारी : ‘स्पेसएक्सच्या मिशन मंगळ अंतर्गत येत्या पाच वर्षांत जर माणूस मंगळ ग्रहावर पोहोचला नाही तर मला नवल वाटेल. मला मंगळावर संपूर्ण स्वावलंबी शहर वसवायचंय आणि पृथ्वीवरचे प्राणी, तिथं घेऊन जायचे आहेत. हा प्रकल्प म्हणजे भविष्यातील ‘नोव्हाज आर्क’ ठरेल. आपण दोनहून अधिक माणसांना मंगळ ग्रहावर घेऊन जाऊ. फक्त दोघांनांच नेलं तर ते गमतीचं ठरेल नाही का, आपण बऱ्याच माणसांना मंगळावर घेऊन जाऊ,’ असा आशावाद अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांनी व्यक्त केला आहे.

टाईम मासिकाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 50 वर्षांच्या मस्क यांनी आपल्या कंपनीच्या भविष्यातील योजना सांगितल्या. पृथ्वीपासून 34 मिलीयन माइल्स अवकाशातील अंतरावर असलेल्या मंगळ ग्रहावर एक स्वयंपूर्ण, सोलरवर चालणारी आणि हायट्रोपोनिक शेतं असणारी एक वसाहत उभारण्याचं मस्क यांचं स्वप्न आहे हे जगजाहीर आहे. या वसाहतीत माणूस जाऊन वास्तव्य करेल असं त्यांचं स्वप्न आहे.

या मुलाखतीत आपल्या मिशन मंगळची डेडलाइन आणखी जवळ आणल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘येत्या पाच वर्षांमध्ये माणूस मंगळावर वसाहत करू शकेल, तसं झालं नाही तर मला नवल वाटेल.’ दरम्यान अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील (State University) स्पेस पॉलिसी तज्ज्ञ प्रा. ग्रेग ऑट्री यांनी बिझनेस इनसायडरशी बोलताना म्हटलं होतं की जर मस्क यांनी नासाची मदत घेतली नाही तर ते 2029 पर्यंत मंगळावर पोहोचू शकणार नाहीत.

बाकीच्या स्पेस तज्ज्ञांचं मत आहे की मंगळावर माणूस दीर्घकाळ तग धरू शकणार नाही. मस्क यांनी एक्स प्राइज या नॉनप्रॉफिट संस्थेला (Non-profit) एप्रिलमध्ये सांगितलं होतं की मंगळ मिशन पूर्ण करण्याच्या वाटेवर कदाचित काही अवकाशवीरांना प्राण गमवावे लागू शकतात. मस्क यांनी मंगळावर जाण्याची डेडलाइन बदलल्यामुळे ते नेहमीच अशक्य अशा डेडलाइन निश्चित करण्यात पटाईत असल्याचं फोर्ब्जच्या लेखात म्हटलं होतं.

Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

2016 मध्ये मस्क यांनी ट्विट केलं होतं की दोन वर्षांत सेल्फ ड्रायव्हिंग टेस्ला कार (Tesla Car) बाजारात येतील. 2019 मध्ये त्यांनी वचन दिलं होतं की टेस्ला रोबोटॅक्सी 2020 पर्यंत रस्त्यांवरून धावतील. द बोअरिंग कंपनीने 2017 मध्ये मोठ्या शहरांत हाय-स्पीड कम्युटर्स टनेल तयार करण्याचं जाहीर केलं होतं. पण मस्क यांच्या मालकीच्या या कंपनीने हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला. गेल्यावर्षी एका कार्यक्रमात वेळ पाळण्यात मी कमी पडतो असं मस्क यांनी मान्य केलं होतं.

स्पेसएक्स कंपनीची सध्याची किंमत 100 बिलियन अमेरिकी डॉलर असून एप्रिल महिन्यात अमेरिकी अवकाशवीरांना चंद्रावर घेऊन जाण्याचं कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला मिळालं होतं. 1972 पासून पहिल्यांदाच असं कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळालं.

टाइमला दिलेल्या मुलाखतीत मस्क म्हणाले, ‘ अवकाशात माणसानी जाणं हे उत्सुकतेपेक्षा आणखी महत्त्वाचं आहे. माणसांना अवकाशात जाणारी संस्कृती विकसित करता यावी हा त्यामागचा उद्देश आहे.’ स्पेसएक्स अवकाशात जाणारी खासगी कंपनी असल्याने आपल्या प्रोजेक्ट्सवर बराच पैसा खर्च करते. अनेक रॉकेट लाँच करण्याच्या प्रयत्नांत स्पेसएक्सचं 2008 मध्ये दिवाळं निघालं होतं. त्याबद्दल टाइमच्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘ कंपनीला दिवाळखोरीचं आलेलं पत्र ही एक प्रेरणादायी घटना होती. ’ दिवाळखोरीसंबंधी गेल्या महिन्यात मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, आपण हरू शकत नाही किंवा इतक्याशा संकटामुळे आत्मसंतुष्टपणे बसू शकत नाही,’ मस्क यांनीच या मुलाखतीत या पत्राबद्दल सांगितलं.

WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही, सायबर सिक्योरिटी कंपनीने केलं अलर्ट

मस्कवर लैंगिक शोषणाचा आरोप

दरम्यान स्पेसएक्समध्ये आधी काम केलेल्या महिला इंजिनीअर अश्ले कोसाकने कंपनीत गेली चार वर्षं आपलं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. मस्क हे इंजिनीयर्सच्या कौशल्यांचा वापर करून घेण्याऐवजी त्यांचं शोषण करतात असंही तिनं म्हटलं होतं. त्यानंतर कंपनीतील पाच माजी कर्मचाऱ्यांनीही स्पेसएक्समध्ये झालेल्या त्यांच्या छळाच्या कहाण्या लोकांसमोर मांडल्याचं ‘द व्हर्ज’ मधल्या बातमीत म्हटलं आहे.तसंच सीएनबीसीनी अशी बातमी दिली होती की कर्माचाऱ्यांच्या स्टॉक व्हेस्टिंग शेड्युलला ऑफर टॅग लावण्यात आल्यामुळे स्पेसएक्समधील दोन उपाध्यक्ष आणि वरिष्ठ संचालकांनी कंपनीचा राजीनामा दिला होता. याबाबत सीएनबीसीशी संवाद साधण्यास स्पेसएक्सच्या प्रवक्त्याने नकार दिला होता.

First published:

Tags: Space-x, अंतराळ