जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Weather Alert: अरबी समुद्रात 'जवाद' चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Weather Alert: अरबी समुद्रात 'जवाद' चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Weather Alert: अरबी समुद्रात 'जवाद' चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

शाहीन चक्रीवादळानंतर अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 ऑक्टोबर: गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी (Heavy rainfall in maharashtra) लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळानं (Cyclone Gulab) मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शाहीन चक्रीवादळानं (Cyclone Shaheen) ओमान देशाला जबरदस्त तडाखा दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसांत या हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे असून हे बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यात 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा जोरदार फटका बसणार आहे. तर काही  ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संबंधित चक्रीवादळाचं नामकरण ‘जवाद’ (Cyclone Jawad) असं करण्यात आलं आहे. हेही वाचा- फक्त 100 रुपयांत कोरोना टेस्ट; घरबसल्या अवघ्या 20 सेकंदात मिळणार रिपोर्ट दुसरीकडे आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासांत पुण्यासह घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर-दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी (Yellow alert) करण्यात आला आहे. हेही वाचा- Corona परतीचं Countdown सुरू! WHO कडून कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, कोकण आणि घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत, त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात अशीच स्थिती कायम रहाणार असून हळुहळू पूर्वेकडील जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात