मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव

कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव

मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय एकाने घेतला. मात्र आपण आत्महत्या केली, तर कर्जासाठी भावामागे तगादा लावला जाईल, या काळजीपोटी त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाचीही गोळ्या घालून हत्या केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  desk news

लखनऊ, 13 जुलै: मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी घेतलेले कर्ज (Loan) फेडणे अशक्य झाल्याने आत्महत्या (Suicide) करण्याचा निर्णय एकाने घेतला. मात्र आपण आत्महत्या केली, तर कर्जासाठी भावामागे (Brother) तगादा लावला जाईल, या काळजीपोटी त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाचीही गोळ्या घालून हत्या (Murder) केली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये. दोन भावांमधील अनोख्या पण अखेर जीवघेण्या ठरलेल्या प्रेमाचा अविष्कार पाहून सगळेच सुन्न झाले. आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवणं शक्य नसल्याची जाणीव झाल्यानंतर अनेक दिवस विचाराधिन असलेल्या प्रेमशंकरनं (वय 55) आपला धाकटा भाऊ प्रेमचंद (वय 53) याला गोळ्या घातल्या आणि आत्महत्या केली.

काय होतं प्रकरण?

प्रेमशंकर आणि प्रेमचंद हे दोन भाऊ एकत्र राहत होते. त्यापैकी प्रेमचंद अविवाहित होता. प्रेमशंकरचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं होती. त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वीच मरण पावली होती. त्याच्या थोरल्या मुलाला झालेल्या एका गंभीर आजावर उपचार करण्यासाठी त्याने स्थानिक ओळखीच्या व्यक्तीकडून 7 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यातून मुलगा बरा झाला, पण प्रेमशंकरला ते कर्ज फेडणं शक्य होईना. त्यातून त्याचा तणाव वाढत गेला आणि आत्महत्या करण्याचा विचार त्याने निश्चित केला. मात्र आपल्या मृत्युनंतर आपल्या धाकट्या भावाला कर्जासाठी विनाकारण त्रास दिला जाईल, असं वाटल्यामुळे त्याने गाढ झोपेत असणाऱ्या स्वतःच्या भावाची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

हे वाचा -पोलीस दिसताच विवाहितेची जळती चिता सोडून नातेवाईकांचं पलायन; धक्कादायक कारण समोर

गोळ्यांचे आवाज ऐकून शेजारी घरी आले, तेव्हा प्रेमचंदचा मृत्यू झाला होता, तर प्रेमशंकर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता त्यालाही डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळावरून देशी कट्टा आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीवरूनच पोलिसांना घटनेचा उलगडा झाला.

First published:

Tags: Murder, Suicide, Uttar pardesh