Home /News /mumbai /

मुंबईत दाऊदचं साम्राज्य इक्बालच सांभाळायचा, मोठ्या नेत्याचं नाव समोर येण्याची शक्यता

मुंबईत दाऊदचं साम्राज्य इक्बालच सांभाळायचा, मोठ्या नेत्याचं नाव समोर येण्याची शक्यता

इक्बाल कासकर याची चौकशी करुन टेरर फंडिंगबाबत NIA तपास तर करणार आहेत. पण तो राजकीय नेता कोण आहे जो डी कंपनीला मदत करत होता?

इक्बाल कासकर याची चौकशी करुन टेरर फंडिंगबाबत NIA तपास तर करणार आहेत. पण तो राजकीय नेता कोण आहे जो डी कंपनीला मदत करत होता?

इक्बाल कासकर याची चौकशी करुन टेरर फंडिंगबाबत NIA तपास तर करणार आहेत. पण तो राजकीय नेता कोण आहे जो डी कंपनीला मदत करत होता?

मुंबई, 11 मे : जर दाऊद इब्राहिमच्या (dawood ibrahim) कारवाया समोर आल्या तर त्यात त्याचा भाऊ इक्बाल कासकरचा (dawood ibrahim brother iqbal kaskar) सहभाग नसणार असं कधी होणारच नाही. स्वतःला व्हाईट कॉलर व्यावसायिक म्हणून सांगणाऱ्या इक्बाल कासकरचा देखील खरा चेहरा ईडीच्या या कारवाईमुळे समोर आला होता तर आता इक्बालने दाऊदच्या या सिंडिकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळेच त्याची NIA कोठडीची द्यावी अशी मागणी NIA करणार आहे. तसंच, या प्रकरणात एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव समोर येण्याची शक्यता आहे. अंमली पदार्थ तस्करी, बांधकाम व्यावसाय, जमिनीचे व्यवहार आणि खंडणी यातून दाऊदला मोठ्या प्रमाणात हवाला मार्फत पैसे जातात हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यातच दाऊदची बहिण हसीना पारकर हिचा मोठा हात होता हे जगजाहीर होते. पण दाऊदचा असा एक माणूस त्याच्या या काळ्या धंद्यात होता जो स्वतःला व्हाईट कॉलर व्यावसायिक म्हणून सांगायचा आणि नेहमीच या ना त्या कारणांमुळे ही व्यक्ती तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचत होता. पण आता या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला असून दाऊदला सर्वोत्परी मदत करणारा हा आहे दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर. काही वर्षांपूर्वी इक्बाल कासरकरवर झालेला हल्ला आणि त्यानंतर समोर आलेल्या अनेक गोष्टींमुळे इक्बाल कासकर चर्चेत आला होता. पण एखाद्या गंभीर गुन्ह्यांत इक्बाल कधीच अडकला नव्हता. इक्बाल हा पहिल्यापासूनच दाऊदच्या सर्व काळ्या आणि बेकायदेशीर धंद्यात लक्ष घालत होता. असं असून सुद्धा इक्बालवर कधीच कोणती मोठी कारवाई झाली नाही .जी कारवाई झाली त्यातून पण तो सहिसलमात बाहेर येत गेला. कारण इक्बाल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ आहे. यामुळे त्याला राजकीय नेते मदत करत तर होतेच पण पोलीसही त्याच्यावर कारवाई करण्यापासून हात आखडता घ्यायचे. (90 हून अधिक कोब्रा पाहून बोबडी वळली, घरातच जुन्या भांड्यात आढळले विषारी साप) इक्बाल कासकर हा दाऊदच्या धंद्यातील पडद्या मागचा नेता होता. “भाई का भाई… वो बोला मतलब दाऊद भाई बोला” असा दबदबा इक्बालचा डी कंपनीत आहे त्यामुळे अंमली पदार्थ तस्करी, बांधकाम व्यावसाय, जमिनीचे व्यवहार आणि खंडणी या सारख्या व्यवहारात राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्यासोबत डील करुन दाऊदच्या धंद्यातील काळा पैसा पांढरा करण्यात आणि काही पैसा हवाला मार्फत दाऊदला पाठवण्यात मोठा हात इक्बाल कासकरचा होता. हे राज्यातील तपास यंत्रणांना माहिती असून पण त्यांनी कधीच त्याच्यावर कारवाई केली नाही. पण NIA ला नुकतंच यांत यश आलं असून दाऊदच्या डी कंपनीचा पडद्या मागचा मोहरक्या इक्बाल कासकर कसा होता? हे आता केंद्रीय तपास यंत्रणा समोर आणतील असं बोललं जातंय. ('हा'अभिनेता आहे साऊथ स्टार महेश बाबूचा भावोजी,श्रद्धा कपूरसोबत केलंय काम) याच करता मोक्का प्रकरणात ठाणे पोलिसांच्या एका गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरची कोठडी ईडीने मागितली होती तर आता टेरर फंडिंग स्लिपर सेल प्रकरणी NIA इक्बाल कासकरची कोठडी मागणार आहे. ED ने टेरर फंडिंग बाबतीत तब्बल ७ दिवसांची इक्बाल कासकरची कोठडी घेतली होती. या सात दिवसात जी माहिती त्यांच्या हातात लागली त्या आधारे NIA ने तपास केला आणि एकाच दिवशी मुंबईत २७ ठिकाणी धाडी टाकल्या आणि आता पुढील तपासाची लिंक जुळवण्याकरता NIA इक्बाल कासकरची कोठडी घेणार त्यातून टेरर फंडिंग बाबत अनेक धक्कादायक खुलासे होतील असा विश्वास NIA ला आहे . NIA ला इक्बाल कासकरची कोठडी पाहिजे कारण इक्बाल कासरची यांत महत्वाची भूमिका आहे असा दावा NIA आणि इडीने याआधी देखील कोर्टात केला होता. इक्बाल कासकरचा सहभाग कसा? - इक्बाल वर मोक्का लावण्यात आलाय - इक्बाल कासकर हा डी कंपनीचा महत्वाचा भाग आहे - डी कंपनी लष्कर-ऐ-तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटेनेच्या संपर्कात आहे - भारतात घातपात करण्याचा डी कंपनीचा डाव आहे अशी माहिती मिळाली - या करता घातक शस्त्रे भारतात आणण्याचा प्रयत्न केला जातोय - सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना धमकावून पैसे गोळा केले जातात त्याचा महत्वाचा भाग इक्बाल कासकर आहे इक्बाल कासकर याची चौकशी करुन टेरर फंडिंगबाबत NIA तपास तर करणार आहेत. पण तो राजकीय नेता कोण आहे जो डी कंपनीला मदत करत होता? याचा देखील खुलासा NIA कोर्टात करणार असल्याचे बोलले जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या