News18 Lokmat

जर ठेवायचे असतील दूर रोग, तर दररोज करा योग - रामदास आठवले

रामदास आठवले यांनी न्यूज18लोकमतशी बोलताना जागतिक योग दिवसाच्या काव्यमय शुभेच्छाही दिल्यात. त्यांच्याच स्टाइलमध्ये ते म्हणाले, ‘जर ठेवायचे असतील दूर रोग, तर दररोज करा योग’

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2018 12:19 PM IST

जर ठेवायचे असतील दूर रोग, तर दररोज करा योग - रामदास आठवले

विवेक कुलकर्णी, मुंबई, 21 जून : रामदास आठवले यांनी न्यूज18लोकमतशी बोलताना जागतिक योग दिवसाच्या काव्यमय शुभेच्छाही दिल्यात. त्यांच्याच स्टाइलमध्ये ते म्हणाले, ‘जर ठेवायचे असतील दूर रोग, तर दररोज करा योग’

भाजपनं राजकीय फायद्यासाठीच जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीशी असलेली युती तोडली असा घरचा आहेर केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या मित्रपक्षाला दिलेला आहे. भाजपनं राजकीय फायद्यासाठीच तीन वर्षांपूर्वी पीडीपीशी युती केली आणि आता राजकीय फायद्यासाठीच युती तोडली असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. पीडीपीशी युती कायम ठेवल्यास २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला फटका पडेल असा विचार करूनच भाजपनं युती तोडली असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

हेही वाचा

ही आहे सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत !

पंतप्रधानांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मोदींनी माझ्याशी लग्न केलं होतं, ते माझ्यासाठी राम आहेत’

Loading...

सामनामध्ये भाजपवर जी  टीका केलीय, त्यावरही त्यांनी आपलं मत मांडलंय. ते म्हणाले,  काश्मीरमध्ये भाजपनं नाही तर पाकिस्तानने अराजक माजवले आहे, त्याकरता भाजपला दोषी ठरवणं चुकीचं आहे. जे काही अतिरेकी हल्ले झाले ते पाकिस्तान करतं त्यामुळे भाजपवर शिवसेनेची टीका चुकीची. शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपशी युती केली पाहिजे.

प्रकाश आंबेडकरांबद्दल बोलताना ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांना १० जागा कोणीही देणार नाहीये. आम्ही एकत्र असतानाही आम्हाला ४ जागा मिळाल्या होत्या. त्यांना काॅंग्रेसबरोबर जायचं असेल तर तो त्यांचा निर्णय असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...